प्रवास अनुभव-1लंडन, दि.१५/७२०२२ ला सकाळी दहा वाजता आम्ही तीन दिवसाकरीता भाड्याने घेतलेले घर सोडले. पुढचा प्रवास रेल्वेने . मॅचेंस्टर स्टेशन गाठले.रेल्वेत बसलो.दोन तास प्रवास करीत आम्ही वेस्ट लंडन रेल्वे स्टेशनवर उतरलो.तिथे ट्रेन बदसली. दुसऱ्या ट्रेनने अर्ध्या तासाचा प्रवास केला. अमरशाम रेल्वे स्टेशनवर उतरलो.रेल्वे स्टेशनवर एका इंग्लिश जोडप्याने आमचे मनापासून स्वागत केले.त्यांनी स्टेशनवर दोन गाड्या आणल्या होत्या. ब्रिटीश पेहरावात पांढर्या शुभ्र कांतीत चकाकणार्या त्या जोडप्यांना मी हात जोडून नमस्कार केला. त्यांनी आमच्या जड बॅगा गाडीत ठेवल्या. मी त्यांना धन्यवाद केला.रस्त्याच्या दुतर्फा सुंदर रंगीबेरंगी फुलांनी लादलेली झाडी,आणि हिरव्यागार नागमोडी रस्त्यावर वळने घेत गाडी त्या टुमदार हिल्स स्टेशन सारख्या गावातील एका बंगल्यापुढे थांबली.तो…Read more
*लक्ष वेधक जाॅरड्रेल बॅंक अवकाश संशोधन केंद्र*हे केंद्र जगासाठी उत्सूकतेचा. त्याला भेट देण्याचा योग मुलीमुळे आला. ही भेट जिवनाकडे चिकित्सकतेने बघण्याची दृष्टी देणारा एक अनुभव ठरला. दि.१३/७/२२ला जाॅरड्रेल बॅंक अवकाश संशोधन केंद्र आणि अवकाश निरीक्षण केंद्राला भेटीचा कार्यक्रम ठरला. त्यासाठी सकाळी तयार होणार. पण अनिकेतला ताप होता.मी थोडा नर्वस झालो. जावे कि नाही या विचाराने गोंधळलो. मी थोडा नकार दाखवताच कन्या थोडी संतापली. तिने खुप दिवसांपासून आमच्या प्रवासाचे नियोजन केले होते. अंत्यत बारकाईने आखणी केली होती. त्यावर गंडातंर येणार असं वाटताच तिला राग येणं सहज होतं. अखेर त्यातून मार्ग काढला.अनिकेत घरी थांबणार असं ठरलं. अनिकेतविना आम्ही प्रवासाला निघालो. तेव्हा अकरा…Read more
विदेश प्रवास अनुभव● जोरॅड्रल बॅंक अवकाश संशोधन केंद्र आणि अवकाश निरीक्षण केंद्रात लोव्हल टेलिस्कोप आणि मार्क-2. हे दोन टेलिस्कोप आहेत. हे अवकाश भौतिकी संशोधन केंद्र १९४५ मध्ये प्रसिद्ध रेडीओ खगोलशास्त्रज्ञ बर्नार्ड लोव्हल यांनी दुसर्या महायुद्धांच्या काळात काॅस्मीक किरणांच्या संशोधनासाठी विकसीत केले होते. त्यात काॅस्मीक किरणांच्या संशोधनाबरोबर गुरूत्वीय किरणे,एस्राईड,व विविध खगोलशास्त्रीय विषयावर संशोधन केले जाते. जोरॅड्रल बॅंक अवकाश संशोधन केंद्र अत्यन्त भव्य असुन २०१९ मध्ये युनेस्कोने या अवकाश संशोधन केन्द्राला जागतीक वारसा (वर्ल्ड युनेस्को हेरिटेज)म्हणून घोषित केले आहे. यात लोव्हल हे मुख्य रेडिओ टेलिस्कोप आहे .त्याचा व्यास २५० फुट आहे.ते जगातील तिसरे सर्वांत मोठे स्टिरेबल टेलिस्कोप आहे.जोरॅड्रल बॅंक अवकाश…Read more
*जपानमध्ये भारताचा तिरंगा आणि मराठीचा झेंडा!*-क्योटोतील बुध्द टेम्पलला भेट*टोकियो/क्योटो, 21 ऑगस्ट*जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरुन 5 दिवसांच्या दौर्यावर गेलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज टोकियो येथे आगमन झाले.तेव्हा मराठी बांधवांनी ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘जय महाराष्ट्र’ असे नारे देत, पारंपारिक मराठी वेषात त्यांचे स्वागत केले. जणू जपानमध्ये महाराष्ट्र साकारला होता.मराठी बांधवांच्या स्वागतानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी छोटेखानी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, तुमच्या स्वागतामुळे जपानमध्ये नाही तर मी मुंबई किंवा पुण्यात आलो, असे मला वाटते आहे. तुम्ही सर्वांनी मराठी भाषा, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा गौरव हा सातासमुद्रापलिकडे जिवंत ठेवला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे…Read more
*- जपानी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यात कक्ष स्थापन करणार*कोयासन, वाकायामा दि. २२ :-जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून जपान दौर्यावर असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट देण्यात येत असल्याची घोषणा आज केली. विशेष म्हणजे कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले भारतीय आहेत.महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज कोयासन विद्यापीठाला भेट दिली, तेव्हा डीन श्री. सोएदा सॅन यांनी ही घोषणा केली. कोया-चो येथील मेयर योशिया हिरानो…Read more
- *दिवसभराच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चांद्रयानाच्या यशाचा भारतीयांसोबत आनंद साजरा*टोकियो, दि.23- जपान दौऱ्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या आणि दिवसभराच्या घडामोडी संपत असताना भारताने चंद्रावर पाऊल ठेवले, तो क्षण जपानमधील भारतीयांसोबत आनंदाने साजरा केला. वंदे मातरम् आणि भारत माता की जयच्या घोषणांनी आज संपूर्ण जपान निनादले होते. या आनंदाच्या आणि ऐतिहासिक क्षणाला संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी पहिली बैठक इस्ट जपान रेल्वे कंपनी, जेआर इस्टचे अध्यक्ष आणि सीईओ यूजी फुकासावा यांच्यासमवेत झाली. कंपनीचे अन्य अधिकारी इकुजू असामी आणि तकेशी त्सुयोशी हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.…Read more
वर्सोवा-विरार सी लिंकला जपान करणार सहकार्य-मुंबई, नागपूर, पुण्यात मोठी गुंतवणूक होणारटोकियो, दि. 25-राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जपानचे केंद्रीय आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी निशिमुरा यांची भेट घेतली. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मेट्रो 3 प्रकल्पातील अडथळे दूर केल्याबद्दल त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतानाच वर्सोवा-विरार सी लिंकला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी जपान सरकारच्या वतीने दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा जपान दौर्याचा चौथा दिवस आहे.यावेळी बोलताना जपानचे आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी निशिमुरा म्हणाले की, जपान जी-7 चे नेतृत्व करीत असून भारत जी-20 चे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे हे दोन देश जागतिक पातळीवर मोठी भूमिका…Read more