बडोले यांना सर्वांचा सर्वस्तरातून पाठिंबा
बडोले यांना सर्वस्तरातून पाठिंबा
घड्याळ चिन्ह घराघरात पोहचले
गोंदिया, दि.18-महायुतीचे राजकुमार बडोले यांच्या प्रचारात भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांनी दिवस रात्र एक केली. मतदान चिठ्ठी घराघरात पोहचवली. त्यामुळे त्यांचे चिन्ह घड्याळ लोकांपर्यंत पोहचले. या प्रचाराने मतदारांमधील चिन्हाचा घोळ संपुष्टात आला.
मोरगाव अर्जुनी विधान सभा मतदार संघ भाजपच लढवणार यावर पक्षश्रेष्ठी ठाम होते. त्यामुळे या जागेसाठी प्रचंड ओढाताण झाली. अखेर उमेदवार आमचा चिन्ह तुमचा यावर समेट झाला. त्यानुसार राजकुमार बडोले यांना खूद उपमुख्यमंत्री राजकुमार बडोले यांना फोन आला. श्रेष्ठीच्या आदेशानुसार घड्याळ चिन्हावर मैदानात उतरले. हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहचविण्यास प्रचारासाठी गावंगाव पालथे घातले. त्यानंतर तालुकांस्तरावर नेत्यांच्या सभांचा सपाटा लावला. सभांमध्ये सर्वस्तरातील मतदारांनी गर्दी केली. . चोवीस तास सर्वांना उपलब्ध असलेला नेता. वागण्यात ,बोलण्यात साधा सरळ माणूस. ही बाब लोकांना भावली. त्यामुळे उमेदवारी मिळाली त्या दिवसापासून कार्यकर्ते प्रचाराला लागले.
जादा मतदानाची स्पर्धा
आता मतदान दोन दिवसावर येऊन ठेपले. त्या अगोदरच विजय निश्चित झाला आहे. विजय जास्तच जास्त मतांनी करून नवा विक्रम करण्यास कार्यकर्ते कामास लागले. बूथनिहाय, गावनिहाय कार्यकर्ते कामास लागले. कोणत्या बूथवर आणि कोणत्या गावात सर्वाधिक मताची आघाडी कोण घेणार .याबाबत आता कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.