info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  15 Jun 2023

कष्टाला आत्मविश्वाची जोड द्या, स्पर्धेत हमखास यशस्वी व्हा

*- विश्वास नागरे पाटील*
मोरगाव/अर्जुनी-  नियमित अभ्यास करा.  कष्टाला आत्मविश्वासाची जोड द्या. त्या जोरावर  स्पर्धा परिक्षा पास करणं सोप आहे. खेड्यांतील मुलेंही पास होऊ शकतात असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नागरे यांनी केले.

माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी  स्पर्धा परिक्षेची तयारी कशी करावी. याबाबत होतकरू तरूणांना मार्गदर्शन करण्यासाठी सरस्वती विद्यालयात शिबीर आयोजित केले होते. त्याला विद्यार्थी व पालकांचा उत्सूर्त प्रतिसाद मिळाला. मंचावर जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, माजी सामाजिक मंत्री राजकुमार बडोले होते. श्री नागरे म्हणाले, हेच क्रांतीचे वय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या15 व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली. या वयात  चांगले संकल्प करा.   उमेद बाळगा. संकल्प पुर्ण होईल. हे वय इतिहास घडविण्याचे आहे. कोणत्या दिशेने जावयाचे आहे. कशात करियर घडवावयाचे आहे. ते ठरवा. अन् त्या दिशेने वाटचाल करा.

 ते पुढे म्हणाले, खेड्यातील मुलें रानपाखरा सारखी असतात. ते शहरी मुलांपेक्षा क्विंचीतही कमी नाहीत. 18 ते 28 हे वय तुमच्या कर्तृत्वाचे आहे. आरामाच्या मागे लागल्यातर मागे पडाल. गंज लागेल. ध्येयासाठी घाम गाळा,  थोडी जोखीम उचला. ही जोखीम, कष्ट तुमचे भविष्य घडविल.

नागरे म्हणाले, स्वत:ची बलस्थाने व दुर्बलता ओळखा. जे कमी आहे. ते आत्मसात करा. जग झपाट्याने बदलत आहे. तुम्ही देखिल काळासोबत बदला. जो बदल स्वीकारील तोच टिकेल. प्रगतीचे यशोशिखर गाठेल. मोबाईलपासून दूर राहा. अभ्यासात सातत्य राखा. स्वत:च्या मनगटावर विश्वास ठेवा. आपल्या पायावर उभे राहा  असे त्यांनी आवाहन केले. शिबीर कमालीचे यशस्वी झाले. विद्यार्थी, युवक, शेतकरी, महिलांच्या विकासासाठी अनेक उपक्रम राजकुमार बडोले सातत्याने राबवित असतात. त्यामुळे त्यांचे उपक्रमाला लोकांची अलोट गर्दी उसळत असते. हे पुन्हा एकदा सिध्द झाले.