info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  16 Nov 2023

महारोजगार मेळावा 2 आणि 3 डिसेंबरला

महारोजगार मेळाव्याचे 2 व 3 डिसेंबरला आयोजन

नागपूर, दि. 16 : राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो तरुणांना रोजगार प्रदान करण्याचे काम शासनाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून केलेले आहे. या अनुषंगाने २ व ३ डिसेंबर रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले आहे. 
राज्यभरातून विविध क्षेत्रातील किमान १००० कंपन्याना यात प्राधान्याने सहभाग करुन घ्यायचे नियोजन आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी या महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होऊन आस्थापनेवर असणाऱ्या रिक्तपदांबाबतची माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन नोंदवावी. जेणेकरुन आस्थापना किंवा कंपनी यांना आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची मागणी तातडीने पूर्ण होण्यास मदत होऊन जिल्ह्यातील बेरोजगार तरुण, तरुणींना रोजगाराच्या संधी प्राप्त होईल.    
  अधिक माहितीसाठी किंवा उद्योजकांची नोंदणी करताना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास कृपया जिल्हा कार्यालयास (०७१२- २५३१२१३) तसेच गजानन हिवरकर (९८२२३२३६१२) यांच्याशी संपर्क साधावा.