info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  22 Jun 2024

लोकसभा निवडणूक निकालाचा आढावा


राकॉं विरूध्दचा रोष भोवला               

तिरोडा, दि. 22 - भारतीय जनता पार्टीने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील   पदाधिकाऱ्यांची बैठक बोदलकसा येथे घेतली.या बैठकीला पक्ष निरीक्षक माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील होते.

 लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आढावा घेण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीत अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी डॉ.पाटील यांनी विस्तृत चर्चा करीत पराभवाच्या मागील कारणे जाणून घेतली. तेव्हा अनेक पदाधिकाऱ्यांनी या मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाची साथ मिळाली नाही. काही पदाधिकारी उघडपणे विरोधात प्रचार करीत होते. अशा तक्रारी केल्या.मतदारांचा राकॉं नेत्यांवर रोष होता. तो सुध्दा भोवल्याचे सांगितले. यावळी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदन  ठराव डॉ. रणजीत पाटील यांनी मांडला. या ठरावाचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी अनुमोदन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मागील दहा वर्षातील कार्याची माहिती दिली. पराभवाला बाजूला सारून पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागून आगामी काळातील निवडणुकांमध्ये विजय खेचून आणण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.