info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  28 Oct 2024

बडोले यांच्या उमेदवारीवेळी तुफान गर्दी

राजकुमार बडोले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास तुफान गर्दी

तालुका प्रतिनिधी

अर्जुनी/मोरगाव,दि.28 - चला फार्म भरावयाला, महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना साथ द्यावयाला ,अशा घोषणा देत हजारों महिला, पुरूषांचे जत्थे कोहळी सभागृहाच्या दिशेने आले. अर्जुनी मोरगाव विधान सभा मतदार संघाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखावर लोकांच्या गर्दीने गावाला जत्रचे स्वरूप आले. सर्व रस्ते माणसांनी भरून वाहत होते. या शहराने अशी गर्दी पहिल्यांना अनुभवली. गर्दी बघून राष्ट्रवादी,भाजप व मित्र पक्षांचे नेते गदगद झाले. सर्वत्र गर्दीची चर्चा होती. राकॉं, भाजपचे झेंडे लक्ष वेधून घेत होते.

रेल्वे स्थानक, बस स्थानक गर्दीने फुलून गेले होते. चाैकाचौकात इतकी गर्दी वाढली की पाय ठेवावयास जागा नव्हती. ऊन कडक होते. त्या ऊनाची कोणाला तमा नव्हती. उमोदवारी अर्ज भरण्याचे साक्षीदार बना, या आवाहनाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दुचाकी, चारचाकी गाड्यांची नवेगाव मार्गावर दूरवर  रांगा दिसत होत्या. लोक मिॆळेल त्या साधनाने आले होते. तुफान गर्दी नियंत्रित करतांनाह कार्यकर्ते व पोलिसांची दमछाक होत होती. अभूतपूर्व गर्दी बघून कार्यकर्ते उत्साहित होते. घराघरांतून लोक पुढे येऊन कार्यकर्त्याना पिण्याचे पाणी पुरवित होते. हे दृश्य लोकांनी प्रथमच अनुभवले. 

गर्दीचा पोलिसांचा अंदाज चुकला होता. राकॉंचे नेते खा. प्रफुल्ल पटेल, राजू जैन  मिरवणूक स्थळी आले. तेव्हा महायुती जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. मिरवणूक उपविभागीय कार्यालयावर पोहचली. तेव्हा दुसरा टोक सभागृहाजवळ होता. मिरवणुकीत ढोल, तासे वाजत होते. बडोले आगे बढोच्या घोषणा निनांदत होत्या.