info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  15 Nov 2024

बडोले यांच्या समर्थनात गावागावांत सभा

महायुतीचे उमेदवार  राजकुमार बडोले यांच्या समर्थनात गावागावांत संयुक्त सभा वाढल्या

मोरगाव/अर्जुनी दि.15-  विधान सभा क्षेत्राचा  विकास हवा. प्रगती हवी. समृध्दी यावी. यासाठी दूरदृष्टी, अनुभवी आणि उच्च शिक्षित उमेदवार हवा. या निकषात केवळ महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले बसतात. त्यामुळे स्वंयमस्फुर्तपणे गावागावात बैठका घेऊन पाठिंबा देत आहेत. त्यांना साथ द्यावी. आम्ही ठरविले. तुम्ही सुध्दा ठरवा. आता केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार राजकुमार बडोले यांना निवडून आणा असा निर्धार करीत आहेत.

या मतदार संघात आतापर्यंत 15 गावात अशा बैठका झाल्या.  या प्रकाराने बडोले सर्वपक्षीय उमेदवार होत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते पहिल्या दिवसापासून प्रचाराच्या कामास लागले आहेत.