स्थान: Gondia
वार्ताहर: साहिल येरने
ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे. सामान्यतः आनुवंशिकता, जीवनशैली, हार्मोन्स आणि वाढते वय यांसारख्या घटकांना स्तनाच्या कर्करोगाची कारणे मानले जाते. परंतु आपल्या दैनंदिन जीवनातील काही सवयींकडे दुर्लक्ष करणे देखील महागात पडू शकते. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंबरीन यांनी त्यांच्या एका इन्स्टाग्राम व्हिडिओ पोस्टद्वारे यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यांच्या मते, पतीची एक वाईट सवय पत्नीमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढवू शकते. जर पतीला धूम्रपानाची सवय असेल, तर ते केवळ त्यांच्या स्वतःच्या आरोग्यासाठीच घातक नाही, तर त्याचा नकारात्मक परिणाम पत्नीच्या आरोग्यावरही होतो. याला ‘पॅसिव्ह स्मोकिंग’ म्हटले जाते. पतीने ही सवय वेळेत न सुधारल्यास महिलांना स्तनाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका संभवू शकतो.








Leave a Reply