वार्ताहर : साहिल येरणे | Rajashthan
ढढीकर गावात १५ फूट लांबीचा अजगर
राजस्थानमधील अलवर येथील ढढीकर गावात अचानक एक १५ फूट लांबीचा महाकाय अजगर बाहेर पडल्याची घटना समोर आली. एवढ्या मोठ्या आकाराचा अजगर गावात आल्याचे समजताच सुरुवातीला नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि एकच खळबळ उडाली.
सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी चढाओढ
अजगराला पाहून गावात निर्माण झालेली भीती काही वेळातच ओसरली आणि लोकांमध्ये अजगरासोबत फोटो काढण्याचा उत्साह वाढला. ग्रामस्थ मोबाइल काढून अजगराचे फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी पुढे सरसावले, ज्यामुळे तिथे मोठी गर्दी जमली.
५ जणांनी मिळून जंगलात सोडले
अजगराला पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी लोकांची झुंबड उडाली असताना, नंतर पाच जणांनी मिळून या १५ फूट लांबीच्या अजगराला सुरक्षितपणे पकडले आणि जंगलात नेऊन सोडले.














Leave a Reply