लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement

अभिजीत दिपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असताना महाराष्ट्रात आजीचे निधन

वार्ताहर : दीपक |

हिंगोलीतील मूळ गावी घेतला अखेरचा श्वास

कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक आणि नेते अभिजीत दिपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके यांचे शनिवारी निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या त्यांच्या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कुटुंबावर शोककळा, आई-वडील हिंगोलीला रवाना

सावित्रीबाई यांच्या निधनाच्या वृत्ताने दिपके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही बातमी समजताच अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके आणि आई अनिता दिपके हे तातडीने हिंगोलीसाठी रवाना झाले आहेत.

अभिजीत दिपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; अंत्यसंस्कारासाठी परवानगीबाबत अनिश्चितता

दुसरीकडे, अभिजीत दिपके सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे ते आजीच्या अंत्यसंस्कारासाठी महाराष्ट्रात प्रवास करू शकतील की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांना अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीहून महाराष्ट्रात जाण्याची परवानगी दिली जाईल की नाही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता समोर आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *