मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी खेळाडूंची नवीन आणि ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या ताज्या क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघातील काही प्रमुख खेळाडूंना फटका बसल्याचे दिसून येत आहे, तर दुसरीकडे एका युवा खेळाडूने क्रमवारीत चांगली प्रगती केली आहे. भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज शुभमन गिल आणि हुकमी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. मात्र, युवा खेळाडू देवदत्त पडिक्कलने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या या ताज्या क्रमवारीत अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत.
आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह, गिलला फटका; देवदत्त पडिक्कलची मोठी झेप









Leave a Reply