लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement

आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त जनजागृती

स्थान: नागपूर

नागपूर, दि. 15 : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा रुग्णालय, नागपूर येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

यावर्षीच्या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाची ‘आत्महत्येबाबतचा दृष्टीकोन बदलूया, संवादाची सुरुवात करूया’ ही संकल्पना असून, त्याअनुषंगाने मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन गुल्हाने, अधिसेविका वंदना बरडे, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. देशमुख, डॉ. स्नेहल निंभोरकर आणि डॉ. अनघा सिन्हा यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मानसिक आरोग्याचे महत्त्व, आत्महत्येचे विचार येत असलेल्या व्यक्तीशी संवेदनशीलपणे संवाद साधणे, त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे तसेच गरजेनुसार वेळेवर वैद्यकीय व मानसोपचारविषयक मदत उपलब्ध करून देणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘बोलूया, ऐकूया आणि मदतीचा हात देऊया’ हा सकारात्मक संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान अधिसेविका वंदना बरडे यांनी उपस्थितांना आत्महत्या प्रतिबंध व मानसिक आरोग्य जनजागृतीबाबतची शपथ दिली. समाजात मानसिक आरोग्याबाबत खुलेपणाने संवाद वाढविणे आणि गरजू व्यक्तींना योग्य वेळी मदत मिळवून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आत्महत्या प्रतिबंध दिनाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवून त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *