लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
राजकुमार बडोले यांनी घेतली कोहलगावच्या दुर्गा मंडळाला भेट
राजकुमार बडोले यांनी घेतली कोहलगावच्या दुर्गा मंडळाला भेट

माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी कोहलगाव येथील सार्वजनिक दुर्गा पहाडीवाला माँ मंडळ येथे नवरात्रोत्सवानिमित्त भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा…

Read More
अमरावती -जिल्ह्यातील यावली शहीद-अडगाव मार्गावर भीषण अपघाताची (Accident News) घटना घडली आहे. यात भरधाव हायड्रा क्रेननी पाच पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघात 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2 जण गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी 7 च्या सुमारास पोलीस स्टेशन माहुली जहागीर हद्दीतील यावली शहीद ते अडगाव मार्गावर अडगावकडून यावली शहीदकडे पायी जाणाऱ्या पाच इसमांना पाठीमागून येणाऱ्या हायड्रा क्रेनने धडक दिली. या अपघातात राजेश बायस्कर, दिनेश व मदारी या तीन इसमांचा जागीच मृत्यू झाला, तर पिंटू चव्हाण व राजू पानसे हे दोघे जखमी झाल्याची माहिती आहेदरम्यान, अपघातातीत सर्व मृत व जखमी हे मध्य प्रदेशातील बक्की चिखली येथील रहिवासी असून त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा पथकाने घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरु केली. दरम्यान, या अपघातात आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माहुली जहागीर पोलीस करीत आहेत. मात्र या अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Three pedestrians were killed and two others seriously injured after a speeding Hydra crane struck five people on the Yawali…

Read More