राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत गट ग्रामपंचायत केशोरी येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमास माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी नवीन ग्रामपंचायत इमारतीमुळे ग्रामस्थांना अधिक सक्षम, सुलभ आणि गतिमान प्रशासकीय सुविधा मिळण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सभापती पौर्णिमाताई ढेंगे, पंचायत समिती सभापती आम्रपालीताई डोंगरवार, पंचायत समिती उपसभापती संदीपजी कापगते, जिल्हा परिषद सदस्य श्रीकांतजी घाटबांधे, पंचायत समिती सदस्य घनश्यामजी धामट, पंचायत समिती सदस्य फुलचंदजी बागडेरिया, ग्रामपंचायत प्रशासक नंदकुमारजी गहाणे, राष्ट्रवादी पक्षाचे नेते योगेशजी नाकाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य तेजुकला गहाणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अनिलजी लाडे, ग्रामविकास अधिकारी नराळेजी तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केशोरी येथे नवीन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण; प्रशासकीय सुविधा अधिक गतिमान होणार: आमदार राजकुमार बडोले














Leave a Reply