फोडणीपासून ते भाजी शिजवण्यापर्यंत रोजच्या जेवणात तेलाचा वापर अनिवार्य असतो. मात्र, सध्या वाढत्या हृदयविकाराच्या समस्या, कोलेस्ट्रॉल आणि पोषणाबाबतच्या जागरूकतेमुळे आरोग्यासाठी कोणते कुकिंग ऑइल सर्वात उत्तम आहे, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. ऑलिव्ह ऑइल, मोहरीचे तेल आणि शेंगदाणा तेलासारखे अनेक पर्याय उपलब्ध असले, तरी केवळ तेलाच्या बॉटलवरील किंवा लेबलवरील दाव्यांपेक्षा त्याचा वापर कसा केला जातो यावर त्याची खरी उपयुक्तता ठरते. कोणत्याही एका तेलाला सर्वांसाठी सर्वोत्तम किंवा ‘बेस्ट’ मानता येत नाही. तेलातील स्निग्ध पदार्थांचे प्रकार (Fats composition), वापराचे प्रमाण, स्वयंपाकाची विशिष्ट पद्धत आणि व्यक्तीचा एकूण आहार या सर्व घटकांवर तेलाचे आरोग्यदायी मूल्य अवलंबून असते. हृदयाच्या आरोग्यासाठी योग्य तेलाची निवड आणि त्याचा समतोल वापर महत्त्वाचा ठरतो.
आरोग्य आणि हृदयासाठी कोणते कुकिंग ऑइल ठरते सर्वोत्तम?














Leave a Reply