लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement

केशोरी येथे नवीन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण; आमदार राजकुमार बडोले यांची उपस्थिती

केशोरी: राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत गट ग्रामपंचायत केशोरी येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा अर्जुनी मोरगाव विधानसभेचे आमदार राजकुमार बडोले उपस्थित होते. या नवीन ग्रामपंचायत इमारतीमुळे ग्रामस्थांना अधिक सक्षम, सुलभ आणि गतिमान प्रशासकीय सुविधा मिळण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास आमदार राजकुमार बडोले यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सभापती पौर्णिमा ढेंगे, पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार, पंचायत समिती उपसभापती संदीप कापगते, जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे, पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट, पंचायत समिती सदस्य फुलचंद बागडेरिया, ग्रामपंचायत प्रशासक नंदकुमार गहाणे, राष्ट्रवादी पक्षाचे नेते योगेश नाकाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य तेजुकला गहाणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल लाडे, ग्रामविकास अधिकारी नराळे तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *