चंद्रपूर : रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीसाठी केलेल्या मटणाच्या बेतातील उरलेल्या भाजीवरून झालेल्या क्षुल्लक वादातून मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची थरारक घटना घडली आहे. ही घटना चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. रमेश श्रीराम बनकर (वय ५५) असे हत्या झालेल्या भावाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रक्षाबंधनाच्या सणानिमित्त बहीण घरी आली होती आणि तिच्यासाठी मटणाचा बेत करण्यात आला होता. त्यानंतर उरलेल्या भाजीवरून दोघा भावांमध्ये वाद झाला. दारूच्या नशेत संतापलेल्या मोठा भाऊ जगन श्रीराम बनकर (वय ६०) याने रमेश यांच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक वार केले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भिसी पोलिसांनी आरोपी जगन बनकर याला अटक केली आहे.
चंद्रपूर: उरलेल्या मटणाच्या भाजीवरून वाद, मोठ्या भावाने कुऱ्हाडीने वार करून केली लहान भावाची हत्या














Leave a Reply