लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement

राष्ट्रपतींचे माजी एडीसी मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांची १२ वर्षांच्या सेवेनंतर मुदतपूर्व निवृत्ती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे ‘एड-डी-कॅम्प’ म्हणून सेवा बजावलेले मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी १२ वर्षांच्या सेवेनंतर लष्करातून मुदतपूर्व निवृत्ती घेतली आहे. उज्ज्वल लष्करी कारकीर्द असलेल्या सांब्याल यांचे इन्स्टाग्रामवरील रील्स व्हायरल झाल्यानंतर त्यांना ‘नॅशनल क्रश’ म्हणूनही ओळख मिळाली होती. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी हा मुदतपूर्व निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. निवृत्तीबाबत ‘द प्रिंट’शी बोलताना सांब्याल म्हणाले की, या निर्णयावर विचार करण्यासाठी त्यांना चार महिने लागले. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि वेदनादायी निर्णय होता आणि असा निर्णय घ्यावा लागेल असा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. निवृत्तीनंतरच्या भविष्यातील योजनांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ते एका मॉडेलवर काम करत आहेत ज्यामध्ये तरुणांना प्रेरित करणे हा एक भाग आहे. देशाच्या विकासासाठी काम करतानाच स्वतःची प्रगती साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच, दैनंदिन काम आणि लष्कराच्या वर्दीची आपल्याला आठवण येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *