• -भारत,जापान,युगांडा,थायलँड, मालदीवच्या खेळाडूचा मेट्रो प्रवास
नागपूर ,दि.17- नागपूरात सुरु असलेल्या आंतरराष्टीय बॅडमिंटन स्पर्धा करिता देश विदेशातून अनेक खेळाडू नागपूर शहरात आले असून आज या खेळाडूने नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट देत नागपूर मेट्रोने एअरपोर्ट मेट्रो स्टेशन-खापरी-झिरो माईल फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रोने प्रवास केला. ज्यामध्ये भारत, जापान, युगांडा, थायलँड, मालदीवच्या खेळाडूंचा, प्रशिक्षकांचा तसेच या स्पर्धेच्या आयोजकांचा देखील समावेश होता.