info@lokhitnews24.com

+91 9834-245-768 ,+91 7498-013-725

जिल्ह्यातील नेते पंचतारांकित झाले, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले

जिल्ह्यातील नेते पंचतारांकित झाले, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले... भंडारा-गोंदिया  हे दोन्ही जिल्हे  हा धान ऊत्पादक. शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळख. महाराष्ट्रातील मागासलेल्या जिल्ह्यात या जिल्ह्यांचा समावेश.  मानव निर्देशांक कमी असला तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  वजनदार आहेत. तरी शेतकरी अडचणीत फसला आहे. गोंदिया जिल्हा अतिदुर्गम आहे.आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख आहे.नागझीरा आणि नवेगांव बांध व्याघ्र प्रकल्प झाला.  देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी मोर या तालुक्यातील विकास जवळपास खुंटला. या भागात साधी दुध डेअरी शुरु करायची असेल तरी पर्यावरणाच्या परवानगी अट आहे. या अटीने सगळे रेतीघाट बंद करण्यात आलेत. विशेष म्हणजे कोणत्याही ग्रामसभेचा ठराव न घेता सगळी गावे ईको सेंसेटिव्ह झोन मध्ये टाकले.…Read more

विमला बी. नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी

विमला आर. नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारीनागपूर दि.10- राज्य सरकारने सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारीपदी विमला आर. यांची बदली करण्यात आली. या दुसऱ्या महिला जिल्हाधिकारी राहतील.या अगोदर मालिनी शंकर ह्या जिल्हाधिकारी होत्या. त्यांनी आपल्या कामाची छाप जिल्ह्यावर सोडली होती.नागपूर विभागिय आयुक्त लंवगारे यांच्या नंतर महत्वाच्या पदावर आलेल्या दुसऱ्या महिला अधिकारी आहेत. विद्यमान जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली अपेक्षित होती. मात्र त्यांची बदली कुठे करण्यात आली. ते अद्याप गुलदस्त्यात आहे.Read more

लारवा आढळल्यास कारवाई करा- महापौर तिवारी

लारवा आढळल्यास  कारवाई करा- महापौर  तिवारी नागपूर, दि. १४ : नागपूर महानगरपालिकेच्या मलेरिया, फायलेरिया विभागाच्या कर्मचा-यांद्वारे करण्यात येणा-या गृह सर्वेक्षणामध्ये एखाद्या घरामध्ये वारंवार केलेल्या सर्वेक्षणात डेंग्यूची अळी (लारवा) कायम दिसून आल्यास संबंधित घरमालकावर दंडात्मक कारवाई करा, असे सक्त निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहेत. तसेच ज्या घराच्या बेसमेंट मध्ये पाणी साचत आहे आणि त्याच्यातून डासोत्पत्ती होत आहे अश्या बेसमेंटच्या मालकांवर सुध्दा कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.            शहरात डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापौरांनी डेंग्यू संदर्भात मनपाद्वारे राबविण्यात येणा-या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक बोलाविली. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत…Read more

नव्या रेल्वे लाईनने विदर्भातील ऊर्जा प्रकल्पांना कोळसा पुरविणे स

रस्ते व लोहमार्ग आधुनिक तंत्रज्ञानाने मजबूत करु  : मुख्यमंत्री *नव्या रेल्वे लाईनने विदर्भातील ऊर्जा प्रकल्पांना कोळसा पुरविणे सुलभ- नितीन गडकरी* नागपूर दि. 31 : महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थितीत काही रस्ते-रेल्वे मार्ग नादुरुस्त झाले आहेत. ते दुरुस्त करताना तसेच नवे रस्ते करताना अनेक पिढ्यांसाठी टिकतील अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. यासाठी राज्य व केंद्र सरकार समन्वयातून काम करेल. देशभर उच्च दर्जाच्या महामार्गाच्या निर्मितीचे कार्य रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी करीत आहेत. या परिस्थितीत त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग राज्याच्या दर्जात्मक रस्ते निर्मितीसाठी होईल यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. नागपूर - नागभीड रेल्वे मार्गावरील कोट्यवधीच्या महत्वाकांक्षी उड्डाण…Read more

प्रलंबित मागण्या पुर्ण करा, मनपा कर्मचा-यांचे धरणे

प्रलंबित मागण्या पुर्ण करा, मनपा कर्मचा-यांचे धरणेनागपूर, दि. ४ : नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे दिले. आंदेलनानंतर राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉइज असोसिएशनद्वारे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना निवेदनही देण्यात आले. विशेष म्हणजे, कर्मचा-यांद्वारे कामाच्या वेळेत कुठलाही अडथळा निर्माण होऊ न देता दुपारच्या अवकाश कालावधीमध्ये  मनपा मुख्यालयातील हिरवळीवर धरणे देण्यात आले. शिष्टमंडळात राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉइज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे, कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे आणि सर्व संगणक चालक आदी उपस्थित होते.        सातवा वेतन आयोग लागू करा.  कार्यरत १९२ संगणक ऑपरेटर्सची सेवा कायम ठेवा.  त्यांना किमान वेतन देण्यात यावे.  पागे समितीच्या शिफारशी लागू…Read more

शेतकर्‍यांना बोनस,उन्हाळी पिकांची रक्कम त्वरित द्या*

*-माजी मंत्री राजकुमार बडोले यांची मागणी**-जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन*गोंदिया, दि.10 -केवळ 50 टक्के बोनस देऊन आघाडी शासनाने शेतकर्‍यांची बोळवण केली . अद्यापही शेतकर्‍यांना उन्हाळी धान विक्रीचे चुकारे देण्यात आले नाही. पीक कर्जासाठी शेतकर्‍यांना बँकाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. पीक कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदान मिळालेले नाही. महाविकास आघाडी सरकार केवळ घोषणा करते. मात्र शब्द पाळत नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या प्रलंबित सर्व मागण्या पुर्ण करून बोनस व उन्हाळी धानाची रक्कम तत्काळ द्यावी, अन्यथा भाजपातर्फे या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी  10 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी माजी आमदार हेमंत पटले,…Read more

प्रतिकारशक्ती वाढविण्यास रानभाज्या उपयुक्त

- रानभाज्या महोत्सवाला लोकांचा प्रतिसादनागपूर, दि 9 :  रानभाज्या महोत्सवातून निसर्गातील वैविध्यपूर्ण रानभाज्याची शहरी भागातील नागरिकांना ओळख होते. विविध औषधी गुणधर्माने युक्त या भाज्यानी. रोगाशी लढण्यासाठी चांगली प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी रानभाज्या महोत्सव उपयुक्त असल्याचे प्रतिपादन  विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी  केले. रानभाज्यांना ओळख मिळवून त्यांची विक्री व्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण होवून शेतकऱ्यांना फायदा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुरुवातीला स्टॉलची पाहणी करून रानभाज्यांची वैशिष्टये व माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी विमला आर यांनी देखील महिला बचतगटांनी, शेतकरी महिला बचतगटांनी रानभाज्या, रानफळांच्या चविष्ट पाककृती करुन त्यांचे प्रदर्शन आयोजित करण्याची सूचना केली. यावेळी योग्य प्रचार-प्रसिध्दीव्दारे या  महोत्सवातील सहभागी स्टॉल विक्रेत्यांच्या रानभाज्यांची विक्री…Read more

सव्वा दोन लाख धान उत्पादकांची महाआघाडी सरकारकडून उपेक्षा*

 *सव्वा दोन लाख धान उत्पादकांची महाआघाडी सरकारकडून उपेक्षा* गोंदिया  हा धान उत्पादकांचा जिल्हा. जिल्ह्यात सव्वा दोन लाखावर शेतकरी. अनियमित पावसाने घात केला. मृग नक्षत्र 7 जूनला लागला.आठवडाभर बरसला. त्यानंतर अचानक बेपत्ता झाला. वीस-पंचवीस दिवसाच्या खंडानंतर आला. या विलंबाने 25 टक्के शेतकऱ्यांची शेती पडित राहिली. त्यानंतर धानावर गाद, करपा, मावा रोग आला. त्याने 70 टक्के शेतकऱ्यांवर संकट कोसळले. वीस टक्केच पीक हाती पडेल. या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. सात दिवसात मदत मिळावी.अन्यथा  आंदोलन उभारावे लागेल.शेतकऱ्यांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींची  दखल घेतली. लगेच  अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव व गोंदिया तालुक्याचा दौरा काढला. नवेगांव बांध, परसोडी रैयत, खोबा, पाटेकुर्रा, मुंडीपार, कोरणी  आदी गावातील शेतकऱ्यांच्या…Read more

कळमना भागात मेट्रोचा उड्डाण पूल कोसळला

- पुलाच्या कामात  भ्रष्टाचाराचा आरोप - ईदच्या सुट्टीमुळे मोठी प्राणहानी टळलीनागपूर,दि.19-  कळमना -पारडीला जोडणारा मेट्रो रेल्वेचा पुल रात्री अचानक कोसळला. सुट्टीचा दिवस असल्याने अनर्थ टळला. या अपघाताने दहशत माजली. या घटनेने नागपूरकर पुला खालून जाण्यास घाबरत आहेत. या बांधकामाचे भूमिपूजव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये केले होते. 450 कोटीच्या यापुलाचे काम 2016 मध्ये पुर्ण करावयाचे होते. ते 2021 ला पुर्ण झाले. त्याचे लोकार्पण जानेवारी- 2022 ला होणार होते. त्यापुर्वीच ते कोसळले. बांधकाम निकृष्ठ झाल्याने ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. रात्री ९ वाजून ३८ मिनिटांला या उड्डाण पुलाचा चक्क ३० मीटरचा अख्खा स्लॉट खाली कोसळला. धाडकन आवाज आल्याने लोक घराबाहेर पडले.…Read more

वन रस्त्यांसाठी 550 कोटी रुपये मंजूर - दत्तात्रय भरणे

  नागपूर, दि. 29 : गडचिरोली जिल्हा 76 टक्के वनाच्छादीत आहे.या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या वनक्षेत्रातून जाणाऱ्या  21 रस्त्यांसाठी केंद्र सरकारने सुमारे 550 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. त्यातून वनातून जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्तीची कामे करा अशा सूचना सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी  दिले.ते म्हणाले, ही कामे करताना 1980 च्या पुराव्यानुसार करता येतात. मात्र, रस्ते निर्मितीसह वने व वन्यजीवांचा अधिवासही मानवासाठी तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे वनातून जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तींची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभागाने समन्वयाने पूर्ण करावीत,            रविभवन येथे आयोजित बैठकीत त्यांनी नागपूर, अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा घेतले.तसेच…Read more