info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  05 Aug 2021

प्रलंबित मागण्या पुर्ण करा, मनपा कर्मचा-यांचे धरणे

प्रलंबित मागण्या पुर्ण करा, मनपा कर्मचा-यांचे धरणे

नागपूर, दि. ४ : नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे दिले. 

आंदेलनानंतर राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉइज असोसिएशनद्वारे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना निवेदनही देण्यात आले. विशेष म्हणजे, कर्मचा-यांद्वारे कामाच्या वेळेत कुठलाही अडथळा निर्माण होऊ न देता दुपारच्या अवकाश कालावधीमध्ये  मनपा मुख्यालयातील हिरवळीवर धरणे देण्यात आले. शिष्टमंडळात राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉइज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे, कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे आणि सर्व संगणक चालक आदी उपस्थित होते.
        सातवा वेतन आयोग लागू करा.  कार्यरत १९२ संगणक ऑपरेटर्सची सेवा कायम ठेवा.  त्यांना किमान वेतन देण्यात यावे.  पागे समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात. ऐजवदार सफाई कामगारांना स्थायी करण्याची २० वर्षाची अट शिथिल करण्यात यावी. याशिवाय शासन नियमाप्रमाणे १०, २० व ३० वर्षानंतर कालबद्ध पदोन्नती लागू करणे आदी मागण्या निवेदनामार्फत आयुक्तांना करण्यात आलेल्या आहेत.