जाती, जमाती, विजाभजच्या आरक्षणाच्या 33 टक्के जागा, खुल्या प्रवर्गाला देण्याचा सरकारचा आदेश............................................वंचितांच्या जागांवर सरकारी दरोडा,काळा जीआर रद्द करा, अन्यथा सत्ता सोडा- राजकुमार बडोले..............................................नागपुर: (०८ मे) फुले- शाहू- आंबेडकर यांचे नाव घेत महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. या सरकारच्या वाणीत आणि करणीत मोठा फरक आहे. वारंवार मागासवर्गीय समाजांवर अन्याय करीत आहे. ठाकरे सरकार त्यांच्या जीवावरच उठली . राज्यात कोरोनाची साथ आहे. लोक दहशतीत जगत आहेत. ऐन कोरोनाच्या काळात अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या हक्काच्या ३३ टक्के जागांवर दरोडा टाकण्याचा डाव रचला. वंचितांची पदोन्नतीने भरावयाची 33 टक्के पदे खुल्या प्रवर्गातुन भरावयाचा शासन निर्णय निर्गमित केला. या निर्णयाने ठाकरे सरकार अनुसूचित…Read more
*महाराष्ट्रात पुतण्यामावशी सरकार- राजकुमार बडोले* *आयोगाला कुलुप,चार हजारांवर प्रकरणे प्रलंबित* *-दक्षता समितीची बैठकच नाही* *- कायद्याने वर्षाला किमान दोन बैठकांचे बंधन* महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे अनु.जाती/अनु.जमातींच्या सगळ्या योजना बंद करणारे सरकार होय. हे सरकार आले. अवघे दीड वर्ष झाले. दीड वर्षात जाती,जमातींसाठी काय केले. तर काहीच नाही. उलट या सरकारने अगोदरच्या सरकारांनी दिले. गरीबांच्या पदरात टाकले. ते काढून टाकण्याचा झपाटा लावला. दीड वर्ष सरकार हेच करीत आहे. हे यांच्या कामकाजावरून सिद्ध झाले . हे लिहीत असताना मनात कोणताही राजकीय हेतू नाही. पक्षीय दृष्टीने प्रेरित होऊन हे लिहीत नाही. पॊटतिडकीने लिहित आहे. समाजाचा एक घटक म्हणुन सरकारच्या कामावर नजर आहे.…Read more
-10 हजार 803 कोटी रुपयांची पंचवार्षिक योजनादुर्गम भागातील एकही गाव अथवा पाडा अंधारात राहू नये- ऊर्जामंत्री नितीन राऊतमुंबई : ग्राहकांना योग्य दाबाचा व अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी येत्या 5 वर्षात राज्यात विविध ठिकाणी उपकेंद्रे, अतिउच्चदाब वीज वाहिन्यांचे जाळे व इतर विविध कामे करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितिन राऊत यांनी आज महापारेषणला दिले.मंत्रालय येथे पंचवार्षिक योजनेअंतर्गत महापारेषणने सादर केलेल्या पंचवार्षिक योजनेचा आढावा घेतांना मेळघाट सारख्या दुर्गम भागातही योग्य दाबाचा वीज पुरवठा करण्यात यावा व दुर्गम भागातील एकही गाव अथवा पाडा अंधारात राहू नये यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी महावितरण व महापारेषण प्रशासनाला दिले.सन 2019-20 ते 2024-25 या पाच वर्षात…Read more
ओबीसी के सन्मान मे, भाजपा मैदान मे...इंजि. राजकुमार बडोले नेहमी आपल्या सोबत सडक/अर्जूनी:- ओबीसी समाजाला पुन्हा राजकीय आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी तसेच शेतकऱ्यांचा खरीप हंगामातील धानाचे बोनस मिळावे,रब्बी हंगामातील धान खरेदीत होत असलेली फसवणूक याला जबाबदार राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजपा सडक अर्जुनी तर्फे माझ्या नेतृत्वात कोहमारा येथे राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर उतरून \'चक्काजाम आंदोलन\' करुन महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आले.या आंदोलनानंतर पोलिसांकडून अटक करण्यात आली.यावेळी ओबीसी आघाडी प्रदेश सदस्य चामेश्वर गहाणे, भाजपा तालुकाध्यक्ष अशोक लंजे,जिल्हा उपाध्यक्ष डाॅ.भुमेश्वर पटले, जिल्हा सचिव शेषराव गिर्हिपुजे,लक्ष्मीकांत धानगाये,महामंत्री गिरधारी हत्तीमारे, शिशिर येळे,परमानंद बडोले,युवा मोर्चा जिल्हा महामंत्री हर्ष मोदी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विलास बागडकर,गौरेश बावनकर,प्रल्हाद कोरे,शहराध्यक्ष…Read more
लेकसहभागातून भूजल संपत्तीचे जतन करा - उद्धव ठाकरे मुंबई दि.१६ : -भूजल संपत्ती ही अतिशय महत्त्वाची असून या संपत्तीचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने गेल्या ५० वर्षात अतिशय महत्त्वाचे कामू केलेले आहे .यापुढेही हे काम अधिक जोमाने करण्यासाठी या कार्यात लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रम आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाला .त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले,जमिनीवरचे पाणी हे दृश्य स्वरूपात दिसते . त्यामुळे त्याचे…Read more
महाराष्ट्रातील वैफल्यग्रस्त युवक आणि राज्य सरकारचे अपयशमहाराष्ट्र राज्य हे अत्यन्त प्रगतीशील विचारांचे राज्य म्हटले जाते. शैक्षणिक द्रुष्टीने अत्यन्त पुढारलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे.विद्येविन मती गेली, मतीविन गती गेली, गतीविन वित्त गेले,वित्तविन शूद्र खचले, इतके अनर्थ या अविद्येने केले,असे म्हणत एका महात्म्याने शिक्षणाचे महत्व बहुजण समाजात बिंबविले. बहुजन समाजाने शिक्षण घ्यावे म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी वस्तीग्रूह शुरू केले.एका अस्प्रूश्य समाजात जन्माला येऊन आपल्या विद्वत्तेने संपूर्ण जगाला दीपविणारे डाॅ.आंबेडकर हे या महाराष्ट्राचे सुपुत्र!शिक्षणाचे महत्व त्यांनी आपल्या गरीब समाजाला दिले आणि त्याची परिणती म्हणून बहुजन शिकायला लागले. आज महाराष्ट्रात शिक्षणाचे प्रमाण जवळपास ९५ टक्के. ज्यांना व्यवस्थेने दूर सारले ते बहुजन, महीला भगिनी ऊच्च विद्याविभूषीत आहेत. वैफल्यग्रस्त…Read more
निसर्ग दिव्यांगांवर जन्मजात कोपला. त्याच्यांवर माणसांनी अन्याय करावा. ही माणसं साधी नाहीत. सरकारातील मंत्री, सचिव व अधिकारी दर्जाची आहेत. ज्यांच्याकडे या संवेदनशील वर्गाचे पालकत्व आहे. ही सरकारी माणसं . कनवाळू मनाचे. सामाजिक जाणीवेचे. यामुळे सरकारनं त्यांना या खात्यात नेमलं. विश्वासानं हे खाते सोपवलं. दोन वर्ष उलटली.सरकारी मनं बदलली नाहीत. त्यांच्या उपेक्षेचे शिकार दिव्यांग ठरले. मरणयातना भोगत आहेत. अशा निर्दयी सरकारात जाणीव-जागृती व्हावी. आणखी विलंब असह्य होईल. तेव्हा लोक ठोकरतील. सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यातील दिव्यांगाच्या विशेष शाळा व कर्मशाळा चालविल्या जातात. या दोन्ही प्रकारच्या शाळांना मागील दोन वर्षात अनुदान नाही. निसर्ग ज्यांच्यावर कोपला. त्यांच्या मदतीला सामाजिक न्याय विभाग उघडला. त्या विभागाकडूनही उपेक्षा.…Read more
विकास योजना तळागाळापर्यंतपोहोचविणार स्वयंसहायता युवा गट- विभागात 506 युवा गटाद्वारे 5 हजाराहून अधिक युवक जोडलेनागपूर दि. 03 :- स्मार्ट मोबाईलच्या युगात अजूनही शासकीय कल्याणकारी योजना या गरजवंतापर्यंत पाहिजे तितक्या प्रमाणात पोहोचत नाहीत. त्यामुळे योजनांचा मूळ उद्देश सफल होत नाही, हीच बाब लक्षात घेऊन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी 18 ते 45 वयोगटातील समाजकार्याची आवड असणाऱ्या युवक-युवतींना घेऊन स्वयंसहायता युवा गटांची निर्मिती केली आहे.राज्यात आतापर्यंत 1656 युवा गटांची स्थापना करण्यात आली۔ त्याद्वारे साधारणता 12 हजार 505 युवक-युवती जोडले गेलेत. अशा पद्धतीने प्रथमच युवकांचा सहभाग करून शासकीय योजनांची चळवळ उभारण्यात येत आहे. समाज कल्याण आयुक्तालतर्फे राबविण्यात येणाऱ्या अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमापैकी…Read more
- कोरोना हरवण्याची जिद्द बाळगा, संयम आणि शिस्तीचे पालन करा मुंबई ,दि. 11: ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले . दुसरा डोस घेऊन १४ दिवस झाले. त्यांना १५ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.. मुख्यमंत्र्यांनी सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना नागरिकांनी संयम बाळगा, गर्दी करू नका, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा.कोरोनाला हरवण्याची जिद्द ठेवा असे आवाहन केले.*फोटो पासेसवर क्यु आर कोड* ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी रेल्वेचा पास ॲपवरून डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही असे प्रवासी शहरातील पालिकेच्या प्रभाग कार्यालयातून तसेच उपनगरीय रेल्वे…Read more
खासगी बस वाहतूकदारांनीजादा भाडे आकारल्यास कारवाईनागपूर दि. 22- खासगी प्रवासी बस वाहतूकदारांना परिवहन विभागाने लगाम लावण्याचा निर्णय घेतला आहे. जादा भाडे आकारणी केल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी खंडेराव देशमुख यांनी दिला आहे. प्रादेशिक परिवहन महामंडळातर्फे एसटी बस प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. ही सेवा देत असतानाच त्याच मार्गावर खासगी बसेसही धावत असतात. परंतु त्यांच्याकडून जादा भाडे आकारणी केल्याच्या तक्रारी प्राप्त होत असतात. त्या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेस पाहता गर्दीच्या हंगामात खासगी बसगाड्यांना प्रति किलोमीटर भाडेदराच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त भाडे राहणार नाही, असे दर शासनाने २०१८ मध्येच निश्चित केले आहेत. त्यानुसार वातानुकूलीत व अवातानुकूलीत बससाठीचे दर निश्चित केलेले आहे.खासगी बसधारक प्रवाशाकडून जास्त…Read more