ओबीसी के सन्मान मे, भाजपा मैदान मे..
ओबीसी के सन्मान मे, भाजपा मैदान मे...
इंजि. राजकुमार बडोले नेहमी आपल्या सोबत
सडक/अर्जूनी:- ओबीसी समाजाला पुन्हा राजकीय आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी तसेच शेतकऱ्यांचा खरीप हंगामातील धानाचे बोनस मिळावे,रब्बी हंगामातील धान खरेदीत होत असलेली फसवणूक याला जबाबदार राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजपा सडक अर्जुनी तर्फे माझ्या नेतृत्वात कोहमारा येथे राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर उतरून \'चक्काजाम आंदोलन\' करुन महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आले.या आंदोलनानंतर पोलिसांकडून अटक करण्यात आली.
यावेळी ओबीसी आघाडी प्रदेश सदस्य चामेश्वर गहाणे, भाजपा तालुकाध्यक्ष अशोक लंजे,जिल्हा उपाध्यक्ष डाॅ.भुमेश्वर पटले, जिल्हा सचिव शेषराव गिर्हिपुजे,लक्ष्मीकांत धानगाये,महामंत्री गिरधारी हत्तीमारे, शिशिर येळे,परमानंद बडोले,युवा मोर्चा जिल्हा महामंत्री हर्ष मोदी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विलास बागडकर,गौरेश बावनकर,प्रल्हाद कोरे,शहराध्यक्ष राजेश बारसागडे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.