info@lokhitnews24.com

+91 9834-245-768 ,+91 7498-013-725

मनगेगातून विहीरी, शेततळे निर्मिती


-रोजगार हमी कडून गरीबी निर्मूलनाकडे योजनेचा प्रवास :    शांतनु गोयल

नागपूर दि. 7 : हाताला काम नसणाऱ्यांना हमीने रोजगार देण्याचे काम करणारा कायदा म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची ( मनरेगा )ओळख होती.मात्र महाराष्ट्रात आता शाश्वत आर्थिक स्रोत निर्माण करणारी योजना म्हणून मनरेगा पुढे येत आहे. या योजनेचा अधिकाधिक लाभ ग्रामीण भागातील नागरिकांनी घ्यावा ,असे आवाहन मनरेगा आयुक्त…Read more

नागपूर देशातील सर्वोत्तम शहर बनविणार-देवेंद्र फडणवीस

*नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर बनवणार*- देवेंद्र फडणवीस*

- क्रेडाई नागपूर मेट्रोच्या नवीन कार्यकारणीचे पदग्रहण*  
 
*नागपूर, दि.24* :  पिण्याच्या पाण्याची सोय, आंतरराष्ट्रीय मानकानुसार घनकचरा व्यवस्थापन, मेट्रो टप्पा-2 व्दारे लगतच्या शहरांना जोडणे, शहराला लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून विकसित करणे, शहराला खड्डेमुक्त करणे आदी उपाययोजनांद्वारे नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा मानस, आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

         येथील सेंटर…Read more

आपत्ती व्यवस्थापन चित्ररथाचा शुभारंभ

आपत्ती व्यवस्थापन 
चित्ररथाचा शुभारंभ

नागपूर, दि. 6 : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्ररथाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. वीज कोसळल्यास होणारे नुकसान आणि उपशमन, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष तसेच तहसील कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक चित्ररथावर प्रदर्शित करण्यात…Read more

व्यक्तीगत लाभाच्या योजना गतीने करा-फडणवीस


नागपूर दि. 13 -प्रधानमंत्री आवास योजना, शेती व घरकुल पट्टे वाटप योजनांसारख्या शासनाच्या अनेक व्यक्तिगत लाभाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत गतीने पोहचवण्यासाठी योग्य नियोजन करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रामटेक येथील उपविभागीय आढावा बैठकीत केले.
      उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या मे महिन्यात १९ व २० मे रोजी हिंगणा, उमरेड, सावनेर, काटोल या उपविभागाच्या मान्सून पूर्व आढावा बैठकी…Read more

' चला जाणूया नदीला अभियान '



*-जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्र सिंह यांच्यासोबत चर्चा*

*नागपूर,दि.२4- नद्यांच्या संवर्धन व संरक्षणासाठी प्रशासन कटीबद्ध असून ‘चला जाणूया नदीला’ हे  राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान नागपूर विभागात यशस्वी करण्यात येईल, असे आश्वासन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी जलतज्ज्ञ तथा ‘चला जाणूया नदीला’ अभियानाच्या अंमलबजावणीकरिता गठीत समितीचे विशेष निमंत्रित डॉ.राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले. 

डॉ.राजेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने  विभागीय आयुक्त कार्यालयात श्रीमती बिदरी यांची भेट…Read more

ट्रव्हल्स बसला आग, 25 प्रवासी ठार

 विदर्भ ट्रव्हल्सच्या बसला आग, 24 प्रवासी ठार                 
- समृध्दी मार्गावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात   

   बुलडाणा दि.1जुलै- सिंदखेडजवळील पिंपळखूटाजवळ समृध्दी मार्गावर बसला मध्यरात्री आग लागली. त्यात 25 प्रवासा जळून ठार झाले.          ही बस नागपूरवरून सायंकाळी साडे पाच वाजता पुण्याच्या दिशेने निघाली होती. पिंपळखुट्याजवळ…Read more

मंत्रीमंडळाचे बहुप्रतिक्षीत खातेवाटप


- पवार गटाकडे अर्थ, सहकार ,अन्न व नागरी पुरवठा खाते
मुंबई, दि. १4:  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बहुप्रतिक्षित खातेवाटप जाहीर केले. यात शिवसेना शिंदे गटाच्या विरोधाला न जुमानता अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली. यावरून शिंदे गटाचे वजन घटल्याचे स्पष्ट होते.

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* यांच्याकडे सामान्य प्रशासन,…Read more

जिल्हा विकास आराखडा 15 ऑगस्ट पर्यंत अंतिम करा- आयुक्त

*जिल्हा विकास आराखडा 15 ऑगस्ट पर्यंत अंतिम करा*
- आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

नागपूर दि.18 - विभागातील सर्व जिल्ह्यांनी विकासाची बलस्थाने, उत्कर्षाच्या संधी तसेच विविध क्षेत्रातील समतोल विकास व त्यासंदर्भात येणाऱ्या संभाव्य अडचणींचा व उनिवांचा अभ्यास करून जिल्ह्याचा विकास आराखडा येत्या 15 ऑगस्ट पर्यंत तयार करावा व या आराखड्यास 2 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा नियोजन समितीची मान्यता…Read more

लवकरच जपानसाठी अधिकची उड्डाणे : देवेंद्र फडणवीस*

*जपानमध्ये भारताचा तिरंगा आणि मराठीचा झेंडा!*

-क्योटोतील बुध्द टेम्पलला भेट

*टोकियो/क्योटो, 21 ऑगस्ट*
जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरुन 5 दिवसांच्या दौर्‍यावर गेलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज टोकियो येथे आगमन झाले.तेव्हा  मराठी बांधवांनी ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘जय महाराष्ट्र’ असे नारे देत, पारंपारिक मराठी वेषात त्यांचे स्वागत केले. जणू जपानमध्ये महाराष्ट्र साकारला होता.

मराठी बांधवांच्या स्वागतानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी छोटेखानी संवाद साधला. त्यावेळी…Read more

फडणवीसांचा जपानमध्ये तिसरा दिवस व्यस्ततेचा*



- *दिवसभराच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चांद्रयानाच्या यशाचा भारतीयांसोबत आनंद साजरा*


टोकियो, दि.23- 
जपान दौऱ्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या आणि दिवसभराच्या घडामोडी संपत असताना भारताने चंद्रावर पाऊल ठेवले, तो क्षण जपानमधील भारतीयांसोबत आनंदाने साजरा केला. वंदे मातरम् आणि भारत माता की जयच्या घोषणांनी आज संपूर्ण जपान निनादले होते. या आनंदाच्या आणि ऐतिहासिक क्षणाला संपूर्ण…Read more