आपत्ती व्यवस्थापन चित्ररथाचा शुभारंभ
आपत्ती व्यवस्थापन
चित्ररथाचा शुभारंभ
नागपूर, दि. 6 : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्ररथाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. वीज कोसळल्यास होणारे नुकसान आणि उपशमन, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष तसेच तहसील कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आले आहेत. साथीच्या रोगांपासून कसे संरक्षण करावे, याचीही माहिती चित्ररथाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. पूर आल्यावर काय करावे याविषयीची माहितीही देण्यात आली आहे.