info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  13 Oct 2021

बुध्दीस्ट सर्किट ईटखोरीपर्यंत वाढविणार*- नितीन गडकरी

धम्ममचक्र प्रवर्ततन दिनी
लॉर्ड बुध्दा टीव्हीवर घोषणा

नागपूर दि.14-  तथागत गौत्तम बुध्दाच्या जीवनात ईटखोरी या स्थळाचे भावनिक महत्त्व आहे. नेपाळी भाषेत *\' ईटी खोए \'* म्हणजे \' यही खो गया \' म्हणतात. कालातंराने त्या स्थळाला लोक  ईटखोरी  म्हणू लागले. हे स्थळ झारखंड राज्यात आहे. बुध्दगयेला जाण्या अगोदर तथागत ईटखोरीला आले होते. त्यांच्या शोधात राजा शुध्दोधन यांचे सहकारी तिथे आले. तथागतांना भेटले. परत चला अशी विनंती केली. तथागतांनी त्यांचे ऐकूण घेतले. त्यानंतर जंगलाच्या दिशेने निघून गेले.  ते बऱ्याच कालावधी नंतर  बोधी वृक्षाखालीच  दिसले .  ते त्या भागातच असतील. कधी तरी भेटतील. या भाबड्या आशेने पिता राजा शुध्दोदन ,पत्नी यशोधरा ,पूत्र राहुल आणि त्यांच्यावर अतोनात प्रेम करणारे सैनिक त्या भागात येत. आवाज देत . शोध घेत. निराश होत.अन् जड अंतकरणाने निघून जात. त्यांच्या वियोगाने परिजन अश्रू ढाळित. कुटूबियांनी या भागात वियोगाचे किती अश्रू ढाळले असतील. त्यांची कल्पना करवित नाही. तरी त्यांचा शोध लागला नाही. तथागत बुध्दाच्या जीवनातील हा भावनिक क्षण म्हणा किंवा टर्निग पांईंट . 

त्या स्थळी आजही हजारो पर्यटक  जातात. तो क्षण आठवतात.तेव्हा भावनिक होतात.त्यांचे डोळे पाणावतात. अनेकांच्या डोळ्यातून अश्रू गळतात. त्या स्थळी कितीदा शुध्दोदन गेले असतील. कितिदा यशोधरा गेल्या असतील. ज्या दिशेने तथागत गेले. त्या दिशेकडे बघत बसल्या असतील. अलिकडे या स्थळाचीही ताटातूट झाली. ते अगोदर बिहार राज्यात होते. बिहार राज्याचे झारखंड आणि बिहार दोन राज्य झाले. त्यामुळे ईटखोरी स्थळ झारखंड राज्यात गेले. 

*लॉर्ड बुध्दा टीव्हीवर घोषणा*

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून लॉर्ड बुध्दा Tv ची टिम केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना भेटली. बुध्दीस्ट सर्किटवर चर्चा केली. तेव्हा गडकरी  म्हणाले, लुम्बिनी ते कुशीनगर. जन्म ते निर्वाणापर्यंंतची स्थळे जोडली. यात लुम्बिनी -जन्म स्थळ, बुध्दगया- बोधीवृक्ष, सारनाथ- प्रथम उपदेश, वैशाली- अंतिम उपदेश ,कुशीनगर- महानिर्वाण, राजगिर व श्रीवास्ती-  अनेक वर्षावास, नालंदा आणि  कपिलवस्तू नगरीचा समावेश आहे. ही स्थळे बिहार व उत्तर प्रदेश राज्यातील आहेत۔लुम्बिनी नेपाळमध्ये आहे.मात्र आपण भारताच्या सीमेपर्यंत हा मार्ग नेला.तेथून लुम्बिनी अवघ्या काही किलोमीटरवर असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा लॉर्ड बुध्द टीव्हीच्या सदस्यांनी झारखंड राज्यातील इटखोरी स्थळाकडे लक्ष वेधले असता क्षणाचा विलंब न करता गडकरी यांनी ईटखोरीपर्यंत बुध्दीस्ट सर्किट वाढविण्याची घोषणा केली. माहिती अभावी हे स्थळ सुटले असेही ते म्हणाले. या भागात मोठ्या प्रमाणात बुध्द अवशेष आढळतात.अनेक मूर्ती, सिक्केही आढळले. पलामू क्षेत्रातील  पान्सा स्तुप, कोटेश्वर सहस्त्र बुध्द,शहरवीरा, करान स्थळही जोडले जातील. संग्रहालयातही अवशेष जमा आहेत.हा मार्ग सहापदरी राहील.
*बुध्दीस्ट पथ प्रगतीवर*
 गडकरी म्हणाले, बुध्दीस्ट पथ प्रकल्पावर (सर्किट) सुमारे 20 हजार कोटी खर्च  केले जातील. 2025 पर्यंत काम काम पुर्ण होईल. या मार्गवर व स्थळांवर काही इमारती उभारण्यात येतील. त्यावर बौध्द संस्कृतीची छाप असेल.  मार्गात काही मूर्ती ,म्यूरेल उभारण्यात येतील. विदेशातून मोठ्या प्रमाणात बौध्द पर्यंटक येतात. त्यांना बुध्द काळातील गतवैभव कळावा असा प्रयत्न आहे. रस्ते बांधकाम विभागासोबत अन्य विभागही काम करीत आहेत. त्यांचा बजेट वेगळा आहे.   रस्ते विभाग सडकेच्या बाजूला वृक्ष लावतो. ते वृक्ष बुध्द संस्कृतीनुसार असावेत अशी खबरदारी घेतली जात आहे.
*कुशीनगरात विमानतळ*
गडकरी म्हणाले, जगात बौध्दाची संख्या मोठी आहे. सिध्दार्थ बुध्द यांचा जन्म व निर्वाण भारतातील आहे. त्यामुळे जगभरातील बौध्द मोठ्या संख्येने भारतात येतात. त्यांच्या सोयी, सुविधांवर भर दिला तर त्यांचे प्रमाण आणखी वाढेल. हे गृहीत धरून काम केले जात आहे.त्यानुसार कुशीनगरला विमानतळ उभारण्यात येत आहे. त्यामुळे जपान व अन्य देशातील बौध्द पर्यंटकांना सरळ कुशीनगरला पोहचता येईल. विदेशी पर्यंटकांमुळे या भागाच्या विकासाला गती मिळेल. पर्यंटन वाढेल. त्यातून हॉटेल व्यवसाय व रोजगार वाढतील. चांगल्या व सुलभ सोयींमुळे पर्यंटकांची संख्या वाढेल. 2025 पर्यंत सर्व  प्रोजेक्ट पुर्ण होतील. महाराष्ट्रातूनही बुध्दीस्ट पथच्या यात्रांचे आयोजन करावे असेही गडकरी यांनी आवाहन केले. कामठीचे ड्रगेंन पॅलेस,चिचोली, दीक्षाभूमी विकास कामांना गती दिल्याचेही  त्यांनी सांगितले.