info@lokhitnews24.com

+91 9834-245-768 ,+91 7498-013-725

विमला बी. नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी

विमला आर. नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी

नागपूर दि.10- राज्य सरकारने सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारीपदी विमला आर. यांची बदली करण्यात आली. या दुसऱ्या महिला जिल्हाधिकारी राहतील.
या अगोदर मालिनी शंकर ह्या जिल्हाधिकारी होत्या. त्यांनी आपल्या कामाची छाप जिल्ह्यावर सोडली होती.
नागपूर विभागिय आयुक्त लंवगारे यांच्या नंतर महत्वाच्या पदावर आलेल्या दुसऱ्या महिला अधिकारी आहेत. विद्यमान जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचा कार्यकाळ पूर्ण…Read more

भास्करचे समुह संपादक प्रकाश दुबे भारतीय प्रेस परिषदेचे सदस्य नि

भास्करचे समुह संपादक प्रकाश  दुबे
भारतीय प्रेस परिषदेचे सदस्य नियुक्त

दिल्ली, दि.8 - केंद्र सरकारने  भारतीय प्रेस परिषदेचे सदस्यपदी दैनिक भास्करचे समुह संपादक प्रकाश दुबे  यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय  देशभरातून  अन्य 21 सदस्यांची नियुक्ती केली .
 त्यामध्ये  सुमन गुप्ता, विनोद जोस, बलदेव गुप्ता, अथााैबा मीतेई, अंशु चक्रवर्ती, जयशंकर गुप्ता, गुरूबीर सिंह, प्रसन्ना मोहंती, आरती त्रिपाठी,जेएस राजपूत , सुधाकर नायर व खा.केशव…Read more

विभागीय आयुक्तपदी विजयालक्ष्मी प्रसन्ना रूजू*



नागपूर, दि. 8   नूतन विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी प्रसन्ना- बिदरी यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रभारी विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला.  विजयालक्ष्मी प्रसन्ना -बिदरी यापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, (इस्रो) येथे नियंत्रक पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत होत्या. 
  जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला, उपायुक्त आशा पठाण, उपायुक्त मंजूषा ठवकर, सहायक आयुक्त हरिष भामरे उपस्थित होते.
  श्रीमती…Read more

गोसेखूर्द प्रकल्प पुर्ण करणार-एकनाथ शिंदे



-*पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे व्यापक नियोजन*

            भंडारा, दि. 12 :  गोसेखुर्द प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार असून या प्रकल्पात परिसराचा कायापालट करण्याची क्षमता आहे. एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणूनही गोसेखुर्दचा विकास करण्यात येत असून पर्यटन व रोजगाराच्या संधी निर्माण करणारा हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन सर्व पातळ्यांवर प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही…Read more

गोंदियाचे नवे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे


नागपूर दि.25 - गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यपालन अधिकारी चिंन्मय गोतमारे यांची बदली करण्यात आली.
 गुंडे यांचा कार्यकाल संपण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली. त्यांना नाशिकला आदिवासी आयुक्त म्हणून पाठविण्यात आले.
Read more

संजय राऊतांना सरकार पडण्याचे दिवसा स्वप्न पडतात

.शिंदे गटातील नेत्यांची खोचक टीका

Nagpur:-महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, कथित भूखंड घोटाळा यांसह अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सीमाप्रश्नाचा मुद्दा लावून धरत, आमच्याकडे अजून खूप बॉम्ब आहेत, वातीही काढलेल्या आहेत. असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…Read more

परसोडी बायपास मार्गाला निधी मिळणार


-गोंदियात दिले निवेदन, पालकमंत्र्याची हिरवी झेंडी

गोंदिया, दि.24- परसोडीतील  वाढते अपघात.धुळामुळे लोकांचे  बिघडणारे आरोग्य  व अन्य आजारांपासून सुटका करा. त्यासाठी एक कोटी रूपयांची तरतूद करा आणि परसोडी बायपास मार्ग करा, अशी मागणी परसोडीवासियांच्या शिष्टमंडळाने गोंदिया जिल्ह्याचे पालक मंत्री व वने,सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.

परसोडी ग्रामपंचायतचे सरपंच तुळशिदास शिवणकर, माजी सरपंच हरिदास हत्तीमारे यांनी गोंदियात ना. मुनगंटीवार यांची भेट…Read more

शिक्षक मतदार संघ निवडणूक

निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज** 

नागपूर, दि.29: विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी रविवारी विभागातील सर्व सहा जिल्ह्यांमध्ये मतदान पथके रवाना झाली आहेत. संबंधित प्रशासन तसेच पोलीस यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. एकूण २२ उमेदवार निवडणूक लढवित असून गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर नागपूरसह अन्य पाच  जिल्ह्यांमध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान…Read more

जी-20 परिषदेची तयारी जोरात


 
*शाळा, महाविद्यालय आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून विविध उपक्रम*

*नागपूर, दि.14* :  शालेय  विद्यार्थ्यांद्वारे अभिरुप जी-20 परिषद, निबंध, वक्तृत्व आदी स्पर्धा मॅरेथॉन, फ्लॅश मॉबच्या माध्यमातून पुढील महिन्यात नागपूर शहरात होऊ घातलेल्या जी-20 परिषदेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी आज संबंधित शाळा,गटशिक्षण अधिकारी व अन्य प्रतिनिधिक संस्थांची बैठक घेऊन जी-20 परिषदेबाबत जनजागृतीसाठी  विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना…Read more

राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा प्रारंभ


सांगली संघाची कोल्हापूरवर मात
नागपूर दि. 16 : कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचा प्रारंभ  क्रीडा ज्योत प्रज्वलित आणि ध्वजारोहण करून करण्यात आला. समर्थ स्टेडियम, चिटणीस पार्क येथे 15 ते 19 फेब्रुवारीदरम्यान राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचा थरार रंगणार आहे. राज्यभरातून 600 खेळाडू दाखल झालेत.
जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व विदर्भ खो-खो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार मोहन मते, आ. प्रवीण…Read more