info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  07 Aug 2022

विभागीय आयुक्तपदी विजयालक्ष्मी प्रसन्ना रूजू*नागपूर, दि. 8   नूतन विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी प्रसन्ना- बिदरी यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रभारी विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला.  विजयालक्ष्मी प्रसन्ना -बिदरी यापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, (इस्रो) येथे नियंत्रक पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत होत्या. 
  जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला, उपायुक्त आशा पठाण, उपायुक्त मंजूषा ठवकर, सहायक आयुक्त हरिष भामरे उपस्थित होते.
  श्रीमती प्रसन्ना- बिदरी भारतीय प्रशासकीय सेवेतील २००१ च्या तुकडीच्या अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी सहाय्यक आयुक्त, तेजपूर, गुवाहाटी (आसाम) म्हणून काम केले आहे. त्यानंतर सहाय्यक आयुक्त, हिंगोली (महाराष्ट्र), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सिंधुदुर्ग), जिल्हाधिकारी (सिंधुदुर्ग), महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव, महाराष्ट्र महिला विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक, संचालक माहिती तंत्रज्ञान,  विभाग, महाराष्ट्र शासन, त्यानंतर विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.