लक्ष वेधक जाॅरड्रेल बॅंक अवकाश संशोधन केंद्र
*लक्ष वेधक जाॅरड्रेल बॅंक अवकाश संशोधन केंद्र*
हे केंद्र जगासाठी उत्सूकतेचा. त्याला भेट देण्याचा योग मुलीमुळे आला. ही भेट जिवनाकडे चिकित्सकतेने बघण्याची दृष्टी देणारा एक अनुभव ठरला. दि.१३/७/२२ला जाॅरड्रेल बॅंक अवकाश संशोधन केंद्र आणि अवकाश निरीक्षण केंद्राला भेटीचा कार्यक्रम ठरला. त्यासाठी सकाळी तयार होणार. पण अनिकेतला ताप होता.मी थोडा नर्वस झालो. जावे कि नाही या विचाराने गोंधळलो. मी थोडा नकार दाखवताच कन्या थोडी संतापली. तिने खुप दिवसांपासून आमच्या प्रवासाचे नियोजन केले होते. अंत्यत बारकाईने आखणी केली होती. त्यावर गंडातंर येणार असं वाटताच तिला राग येणं सहज होतं. अखेर त्यातून मार्ग काढला.
अनिकेत घरी थांबणार असं ठरलं. अनिकेतविना आम्ही प्रवासाला निघालो. तेव्हा अकरा वाजले होते.
एरवी ब्रिटनमध्ये ऊन्हाळा ॠतू सुरू असला तरी आकाश ढगांनी व्यापले होते. मेंचेस्टरमधील सेमॅटी रोडपासुन आम्ही ट्रामनी प्रवास करणार होतो. आम्ही थांबलो त्या ड्राॅयलंडन पासून अवघे ४५ मिनिटांवर जाॅरड्रेल बॅंक अवकाश संशोधन केंद्र होते.सिमेट्री रोडपासुन आम्ही ट्राम पकडली.तिने पिकाडेलीपर्यंत प्रवास केला.
येथील ट्राॅम म्हणजे मेट्रो सारख्याच.शहराच्या प्रमुख रस्यांवर धावणाऱ्या इकडच्या स्वच्छ सुंदर ट्राॅम आणि कलकत्त्यात धावणाऱ्या ट्राॅम यांच्यात बराच फरक आहे.
सगळीकडे स्वच्छता आणि रंगीबेरंगी फुलांनी लदबदलेली झाडे.ती पाहून मनाला खुप बरे वाटते.
पिकाॅडेलीपासुन आम्ही ट्रेनने प्रवास करीत होतो. गुस्ट्रीपर्यंतचा प्रवास अत्यन्त आल्हाददायक! रस्याच्या आजुबाजूला हिरव्या झाडांची गर्दी. स्टेशनवर फुलांच्या कुंड्या. शेतात उभी असलेली हिरवीगार पीके आणि दुतर्फा सुंदर घरे होती. त्यामधून आमची ट्रेन चालली होती.या प्रवासात एखादी झोपडी किंवा स्टेशनवर भिकारी शोधत होतो.पण मला या प्रवासात अशा झोपड्या किंवा भिकारी सापडला नाही.
गुस्ट्रीपासून आम्ही टॅक्सी घेतली. तो इंग्रजी टॅक्सी ड्रायव्हर होता. आदरपुर्वक बोलत होता.दहा मिनीटात आम्ही जाॅरड्रेल बॅंक अवकाश संशोधन केंद्रात पोहोचलो.
परिसर अत्यन्त भव्य. सुंदर झाडे आणि फुलांनी गजबजलेला परिसर. त्यात रस्त्यावर चालताना येणारा आनंद भव्यतेची साक्ष देत होता...
कांही मिनिटांत आम्ही जाॅरड्रेल बॅंक अवकाश केंद्राला भेट दिली....(पुढे...