info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  11 Dec 2024

गोंदिया जिल्ह्याचे राजकारण मंत्रीपदावर ठरणार


-खा. पटेल यांची परीक्षा

मुंबई, दि.11-गोंदिया जिल्ह्याला मंत्री पद मिळावे.ही लोकभावना आहे. त्यात  खा. प्रफुल्ल पटेल खोडा घालतात. ही भावना वाढीने खा.प्रफुल्ल पटेल यांचे विरोधात वातावरण निर्माण होत आहे. ही चुक त्यांनी पुन्हा केली तर विविध समाज त्यांच्या विरोधात एकत्र येण्याची शक्यता आहे.

गोंदिया जिल्ह्यातील झाडी पट्टीत 20 टक्के बौध्द समाज आहे. त्यापैकी गोंदिया,भंडारा जिल्ह्यातील बौध्द समाज जागृत आहे. बिडी आंदोलनामुळे हा समाज सक्रिय आहे. हा समाज ज्या पक्षासोबत जातो. तो पक्ष या भागात निवडून येतो.

लोकसभेत हा समाज कॉग्रेससोबत गेला. मात्र जात वर्गीकरणावर कॉंग्रेसने भूमिका घेतली नाही. परिणामी हा समाज राजकुमार बडोले यांच्यामुळे  महायुतीसोबत गेला. बडोले यांनी  इंदूमीलची जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मिळवली. तिथे भव्य स्मारक उभारले जात आहे. लंडन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घर राज्य सरकारला विकत घेण्यास भाग पाडले. बुध्दीस्ट सर्कल, भीमा कोरेगाव स्मारक अशी विविध कामे केली. त्यामुळे ते महाराष्ट्रासह देशभर कणखर बौध्द नेते म्हणून ओळखले जातात. त्याचा फायदा पक्षाला विविध राज्यात मिळू शकतो. ते भाजपमध्ये असते. तर पक्षाने त्यांना त्यादृष्टीने उपयोग करण्याची योजना होती.मात्र राजकीय वाटाघाटीत राष्ट्रवादीत जावे लागले. या पक्षात खा. पटेल म्हणतील ती पूर्वदिशा असते. त्यामुळे मंत्री पदाची अपेक्षा वाढली. यात खा. पटेल चुकले. तर त्यांची मोठी राजकीय किंमत त्यांना मोजावी लागेल. परिणामी बौध्द समाज राष्ट्रवादी पक्षापासून दूर जाईल. त्यांचा फटका जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप व राकॉं या दोन्ही पक्षांना जबरदस्त फटका बसू  शकते.  हे चित्र लक्षात घेता  राजकुमार बडोले यांना मंत्री बनवून  दलित-बोध्द समाजाला जोडण्याचा प्रयत्न राहील. तसेच भविष्यात पक्षासाठी एक दमदार कार्यकर्ता मिळू शकते.

 रामटेक लोकसभा मतदार संघ चार टर्मनंतर खुल्या गटात जाणार आहे. त्यानंतर गोंदिया-भंडारा  मतदार संघ 2029 च्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षित होईल.  तेव्हा एक सशक्त उमेदवार असावा. त्या दिशेनेही मंत्री बनवून एक उमेदवार तयार करण्याच्या दृष्टीनेही बडोले यांच्याकडे बघितले जाते. राकॉ आणि भाजप त्या दिशेनेही बडोलेंकडे बघत आहेत.

खा.पटेल यांनी मोरगावअर्जुनी विधानसभा मतदार संघात प्रचारात स्वत:ला झोकून दिले होते. ही निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली होती.वर्षा पटेल , राजू जैन हे सुध्दा प्रचारात उतरले होते. या प्रचाराने बडोले यांनी प्रचारात आघाडी घेतली. उमेदवारी घोषित होईपर्यंत अनेक लक्षवेधी घटना घडल्या. विद्यमान आमदाराचे तिकिट कापून बडोले यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे हा मतदार संघ राज्यभर गाजला. महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले  दणदणीत मतांनी विजयी झाले. अन्  लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला.