info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  19 Nov 2024

जनतेची पहिली पंसंती बडोलेची 'घड्याळ'

मोरगाव अर्जुनी क्षेत्रातील जनतेची पंसती राजकुमार बडोलेंची घड्याळ

मोरगावअर्जुनी, दि.19- महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले आणि कॉंग्रेसचे दिलिप बन्सोड अशी लडत दिसत होती. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी काल सभा घेतली. त्यात विक्रमी मताने घड्याळ चिन्हावर लढणारे बडोले यांना विजयी करा. बाकी सर्वाची जमानत जप्त करा .असे आवाहन केले. सभेनंतर वातावरण झपाट्याने बदलले. परिणामी हवा हवा घड्याळाच्या बाजुने झुकली.

या मतदार संघात भाजपचे मध्यप्रदेशचे नेते नरोत्तम मिश्रा आणि काही कार्यकर्ते आठवड्याभरापासून डेरा टाकून आहेत. भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यावर नजर ठेवून आहेत. प्रचारात न दिसणाऱ्या कार्यकर्त्याला बोलावून लगेच त्यांची कानउघाडणी करतात. त्यांच्या हजेरीचा अनेकांनी धसका घेतला. दरम्यान नितीन गडकरी यांची सभा झाल्याने भाजपवाल्यांनी निवडणूक अंगावर घेतली आहे. आज कत्तल की रात म्हणतात. त्यामुळे कार्यकर्ते रात्र जागून काढणार. भाजपच्या बालेकिल्यात महायुती कार्यकर्त्याशिवाय अन्य पक्ष व अपक्षांना घुसू न देण्याची तयारी केली आहे. तसेच सकाळीच बूथ कार्यकर्त्यांना पाठविण्याची चोख व्यवस्था तेच पार पाडणार. त्यानंतर मतदार याद्या घेवून आपल्या मतदारांना मतदान केंद्रावर पोहचविण्याचे कामास लागणार आहेत. इतके सुक्ष्म नियोजन भाजपकडून करण्यात आले. बूथस्तरावरच्या फळीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचाही काही प्रमाणात समावेश करण्यात आला.