जिल्ह्याला मंत्रीपद मिळण्याची शक्यता
जिल्ह्याला मंत्रीपद मिळण्याची शक्यता !
गोंदिया, दि.23- जिल्ह्यातील वजनदार नेते खा.प्रफुल्ल पटेल हे जिल्ह्यातील आमदारांना मत्री करीत नाहीत. या चर्चेमुळे त्यांच्या नेतृत्वाला ग्रहण लागले. यावेळी हा आरोप खोटा ठरेल. अनुसूचित जातीतील राजकुमार बडोले यांना मंत्री बनवून दुरावलेल्या दलित-बोध्द समाजाला जोडण्याचा प्रयत्न राहिल.याशिवाय त्यांचा स्वभाव व अल्पसंख्याक असल्याने ते वरचड ठरण्याची अजिबात भीती नाही असे त्यामागचे गणित आहे.
रामटेक लोकसभा मतदार संघ चार टर्मनंतर खुल्या गटात जाणार आहे. त्यानंतर गोंदिया-भंडारा मतदार संघ 2029 च्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षित होईल. तेव्हा एक सशक्त उमेदवार असावा. त्या दिशेनेही मंत्री बनवून एक उमेदवार तयार करण्याच्या दृष्टीनेही बडोले यांच्याकडे बघितले जाते. राकॉ आणि भाजप त्या दिशेनेही बडोलेकडे बघत आहे.
खा.पटेल यांनी मोरगावअर्जुनी विधानसभा मतदार संघात प्रचारात स्वत:ला झोकून दिले होते. ही निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली होती.वर्षा पटेल , राजू जैन हे सुध्दा प्रचारात उतरले होते. या प्रचाराने बडोले यांनी प्रचारात आघाडी घेतली. उमेदवारी घोषित होईपर्यंत अनेक लक्षवेधी घटना घडल्या. विद्यमान आमदाराचे तिकिट कापून बडोले यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे हा मतदार संघ राज्यभर गाजला. महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना 81 हजारांवर मते पडली. सुमारे साडे सोळा हजारांवर मतांची आघाडी घेत विजय मिळविला. 2019 च्या निवडणुकीत सातशे मतांनी पराभूत झाले होते. त्या पराभवाचा या निवडणुकीत वचपा काढला. लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांना 71 हजारांवर मते पडली होती. त्यापेक्षा पोषक वातावरण या विधानसभा निवडणुकीत होते. त्यात बडोले यांनी अकरा हजारांवर मतांची भर घातली.
महाविकास आघाडीचे उमेदवार दिलिप बन्सोड यांनी 66091 मते घेतली. प्रारंभी त्यांना पार्सल उमेदवार म्हणून विरोध झाला. परंतु शेवटीशेवटी त्यांची स्थिती सुधारली. त्यांचे कारण परंपरागत कॉंग्रेसची मतें आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे समर्थकांनी लावलेला जोर आहे. आ.मनोहर चंद्रिकापूरे यांना राकॉंने उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांचे पूत्र डॉ. सूगत चंद्रिकापूरे अपक्ष लढले. त्यांना शिंदे गटाकडून रसद पुरविण्यात आल्याची चर्चा होती. त्यांनी माहौल केला होता.मात्र 15428 वर थांबले. कॉंग्रेसमध्ये सुध्दा बंडखोरी झाली. अभय लांजेवार लढले. याशिवाय काही अपक्ष होते. त्यांना चमक दाखविता आली नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादी मजबूत करावयाची असेल तर बडोलेंना मंत्री बनवावे लागेल. अन्यथा दलित समाज पटेल यांचे भावी राजकारण अडचणीत आणू शकते.अन् ही बाब पटेल यांना राजकीयदृष्ट्या परवडणारी नसेल. कारण हा समाज गोंदिया, भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याने संवेदनशील मुद्दा आहे. हे लक्षात घेवून पटेल योग्य निर्णय घेतील. याशिवाय मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांचा बडोलेंसाठी वेगळा दबाब सुरू झाला आहे..