info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  19 Jul 2022

लंडन प्रवासातील सुखद अनुभव

प्रवास अनुभव-1
लंडन, दि.१५/७२०२२ ला सकाळी दहा वाजता आम्ही तीन दिवसाकरीता भाड्याने घेतलेले घर सोडले. पुढचा प्रवास  रेल्वेने . मॅचेंस्टर  स्टेशन गाठले.रेल्वेत बसलो.दोन  तास प्रवास करीत आम्ही वेस्ट लंडन रेल्वे स्टेशनवर उतरलो.तिथे ट्रेन बदसली. दुसऱ्या ट्रेनने अर्ध्या तासाचा प्रवास केला. अमरशाम रेल्वे स्टेशनवर उतरलो.रेल्वे स्टेशनवर एका इंग्लिश जोडप्याने  आमचे मनापासून स्वागत केले.

त्यांनी स्टेशनवर दोन गाड्या आणल्या होत्या. ब्रिटीश पेहरावात  पांढर्या शुभ्र कांतीत  चकाकणार्या त्या  जोडप्यांना मी हात जोडून नमस्कार केला. त्यांनी आमच्या जड बॅगा गाडीत ठेवल्या. मी त्यांना धन्यवाद केला.रस्त्याच्या दुतर्फा सुंदर रंगीबेरंगी फुलांनी लादलेली झाडी,आणि हिरव्यागार नागमोडी रस्त्यावर वळने घेत गाडी त्या टुमदार हिल्स स्टेशन सारख्या  गावातील एका  बंगल्यापुढे थांबली.

तो बंगला  प्रशस्त होता.त्याच्या एका बाजूला फळा फुलांनी बहरलेली मोठी बाग.त्यात सफरचंदाची मोठी झाडे.त्या झाडावर हिरवीगार सफरचंद लागलेली होती.बंगल्याच्या पुढे भला मोठा सेडार व्रूक्ष होता.तो किमान शंभर वर्षाचा असावा असे मला  सांगितले. 

आम्ही बंगल्याच्या आवारालगत असलेल्या खुर्च्यांवर बसलो.त्यातच त्यांच्याकडे असलेल्या डाॅगने आम्हा सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले.तोंडात चेंडू घेऊन आमच्या कडे टक लावून पाहत होती.तीचे दोन्ही कानावरून खाली लोळणारे केस खुप मस्त  दिसत होते.ती चेंडू खाली ठेवत होती. तो चेंडू आपण हातात घेतला कि ती दूर हिरवळीवर जाऊन ऊभी रहायची. तो चेंडू आपण फेकला कि  ती त्याला शोधून परत तोंडात घेऊन आमच्याकडे येत होती.तिचा हा खेळ सतत शुरु असायचा.आपण तिच्याकडे दुर्लक्ष केले कि ती चेंडू घेऊन टेबलाच्या चारी बाजुला चक्कर मारत फिरत असे.त्यांनी  स्वतः तयार केलेले इंग्लिश जेवन आम्हाला वाढले.
 ते जोडपे सतत नवनवीन गोष्टी सांगत होते.पण त्यांची पारंपारिक इंग्रजी भाषा आम्हाला पुर्णतः कळत नव्हती.आम्ही प्रवासामुळे थकलो होतो. ते सतत आमच्यासाठी चहा काॅफी घेण्याचा आग्रह करीत होते.दुसर्या दिवशीच्या प्रवासाबाबत त्यांनी नियोजन केले. आणि रात्री निवांतपणे डोळा लागला. 
   
सकाळी दहा वाजता एक स्थळ पहायला निघालो. 

क्लेव्हेडाॅन फाॅर्म अत्यन्त सुंदर.टेम्स नदी त्या ठिकाणी खुप अरूंद!पण खूप खोल.त्यात दिसणारे हिरवे गार पाणी आणि त्यात चालणार्या बोटी मनाला भुरळ घालतात. नदीच्या दुतर्फा मोठमोठाली झाडे.पण निसर्गाने खुप दिलेल्या या सौंदर्यात या  लोकांनी खुप भर घातली हे विसरता येत नाही. सगळी ठिकाणे सुंदर ठेवण्यात आणि त्यांच्या सौंदर्यात या लोकांचा खुप मोठा वाटा आहे हे मला आवर्जून वाटत होते.इतक्या प्रचंड झाडांच्या आणि शेतांच्या गर्दीत एक मच्छर मला कुठेही दिसला नाही.कुठेही घान  नाही कि कचरा नाही.दिव्यांग आणि जेष्ठांना सगळीकडे सोई सुविधा!माणसे मनाने प्रगल्भ झाली तरच शासनाने निर्माण केलेल्या वास्तू सुयोग्य असतील!आणि पर्यायाने देश सुंदर आंणि ऐश्वर्यसंपन्न होइल.कारण तिकडच्या गावातील रस्ते,पाणी,नाली इत्यादी सुविधा पाहुन मला हे वाटले..(.पुढे)