info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  08 Oct 2025

न्यायव्यवस्थेवर हल्ला- आ.राजकुमार बडोले


- सरन्यायधीशांवरील हल्ल्याचा निषेध
  नागपूर, दि.६- देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोर्टरूममध्ये हल्ला झाला. ही हल्ला एका व्यक्तीवर  नव्हे, तर भारतीय न्याय व्यवस्थेवर आणि लोकशाहीच्या मुल्यावर हल्ला आहे. देशाच्या इतिहासातील सर्वाधिक लज्जास्पद घटना आहे.  या  शब्दात माजी समाजकल्याण मंत्री आ. राजकुमार बडोले यांनी या हल्ल्याचा तीव्र  निषेध केला.
 
 ते म्हणाले , वकिल न्यायाचा पुजारी असतो. त्या वेषातील या कृत्याने जगात न्यायप्रिय भारताची प्रतिमी डागाळली. ही घटना संविधान, सामाजिक न्याय आणि समानतेच्या तत्वावर हल्ला आहे. हा देश संविधानावर  चालतो.हा देश न्यायाचा आहे.समानतेचा आहे. कुणाच्याही जाती-धर्माचा नाही. या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा करावी. माफी नाही.  या घटनेमुळे देश व्यथित आहे. 

*महाराष्ट्र अस्मितेवरही हल्ला*

बडोले म्हणाले, महाराष्ट्राच्या पूत्रावरील हा हल्ला महाराष्ट्र अस्मितेवरही  हल्ला  आहे.
 संविधानाचे रक्षणकर्ते सुरक्षित नाहीत. त्यांना अपमानित व्हावे लागत असेल तर सामान्य माणसाचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडेल. ते टाळण्यास आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे असेही ते म्हणाले.