info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  30 Jun 2025

गोंदिया जिल्हा बँक निवडणुकीत दोन आमदारांनी महायुतीला तारले


गोंदिया, दि.30- गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. राजकुमार बडोले यांनी काँग्रसचे उमेदवार दिलिप  बन्सोड यांचा दणदणीत पराभव केला. या विजयाने गोंदिया जिल्ह्यावर आपली पकड मजबूत असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले. या सोबतच दोन आमदारांनी महायुतीला तारले अशी चर्चा रंगली आहे.

मोरगाव/अर्जुनी विधान सभा क्षेत्रात विधान सभेच्या निवडणुकीत राकॉंचे राजकुमार बडोले विरूध्द कॉंग्रेसचे दिलिप बन्सोड अशी लढत झाली होती. या अटीतटीच्या लढतीत बडोले यांनी मैदान मारले होते. त्यानंतर ही दुसरी निवडणूक दोघांमध्ये  होती. त्यामुळे याकडे  संपूर्ण  जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निवडणुक विजयाने राजकुमार बडोले यांनी पहिल्यादाच सहकार क्षेत्रातील राजकारणात प्रवेश केला. महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशीच ही लढत होती. या जिल्ह्यात बाकी पक्षाचे फार अस्तित्व नाही. त्यामुळे भाजप-राकॉंची सहकार पँनेल विरूध्द  कॉंग्रेसची परिवर्तन पँनेल अशीच लढत झाली. परिणामी खा प्रफुल्ल पटेल विरूध्द आ. नाना पटोले असे लढतीला स्वरूप आले होते.

सहकार पँनेलचे  11  उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये आ. राजकुमार बडोले, आ.विजय राहांगडाले आणि माजी आमदार राजू जैन यांचा समावेश आहे. राजू जैन हे बँकेचे मावळते अध्यक्ष आहेत. त्यांना पुन्हा अध्यक्षांची संधी मिळण्याची शक्यता आहे. अन्य विजयी उमेदवार.
 आमगाव- भेरसिंग नागपुरे ,
 देवरी - प्रमोद संगीडवार ,गोंदिया- केतन तूरकर, तिरोडा-आ.विजय राहांगडाले, मोरगाव अर्जुनी-पुस्तोडे, अविनाश जायसवाल ,रचना गहाने , प्रिया हरिणखेड़े, विनोद कन्नमवार यांचा समावेश आहे.

परिवर्तन पँनेलच्या विजयी उमेदवारांमध्ये  सालेकसा - बंटी कटरे, सड़क अर्जुनी- गंगाधर परशुरामकर ,गोरेगांव -  दुर्गा ठाकरे, औद्योगिक -- अरुण दुबे , दूध संघ - पंकज यादव, मजूरसंघ - राठौड़ , जंगल कामगार- गप्पू  गुप्ता , मच्छीमार संघ - बाला हलमारे आणि प्रफुल्ल अग्रवाल यांचा समावेश आहे. या अटीतटीच्या लढतीत 11 विरूध्द ९ असा सामना सुटला.