गोंदियाचे नवे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे
नागपूर दि.25 - गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यपालन अधिकारी चिंन्मय गोतमारे यांची बदली करण्यात आली.
गुंडे यांचा कार्यकाल संपण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली. त्यांना नाशिकला आदिवासी आयुक्त म्हणून पाठविण्यात आले.