info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  01 Jul 2023

ट्रव्हल्स बसला आग, 25 प्रवासी ठार

 विदर्भ ट्रव्हल्सच्या बसला आग, 24 प्रवासी ठार                 
- समृध्दी मार्गावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात   

   बुलडाणा दि.1जुलै- सिंदखेडजवळील पिंपळखूटाजवळ समृध्दी मार्गावर बसला मध्यरात्री आग लागली. त्यात 25 प्रवासा जळून ठार झाले.          ही बस नागपूरवरून सायंकाळी साडे पाच वाजता पुण्याच्या दिशेने निघाली होती. पिंपळखुट्याजवळ बसच्या टायरला आग लागली. त्या आगीचा भडका उडाल्याने बस दुभाजकाला धडकली. त्याने ती उलटली. त्यामुळे संपुर्ण बसने पेट घेतला. 24 प्रवाश्याचा जळून मृत्यू झाला. समृध्दी मार्गावरील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा अपघात होय.             बसच्या चालक-वाहकासह 5 प्रवासी बचावले. पोलिस घटनास्थळी पोहचले

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त*

*मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर*बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या  झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

 या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत.

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त

विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 

या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
 जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल.