info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  17 Jul 2021

लारवा आढळल्यास कारवाई करा- महापौर तिवारी

लारवा आढळल्यास  कारवाई करा- महापौर  तिवारी
 
नागपूर, दि. १४ : नागपूर महानगरपालिकेच्या मलेरिया, फायलेरिया विभागाच्या कर्मचा-यांद्वारे करण्यात येणा-या गृह सर्वेक्षणामध्ये एखाद्या घरामध्ये वारंवार केलेल्या सर्वेक्षणात डेंग्यूची अळी (लारवा) कायम दिसून आल्यास संबंधित घरमालकावर दंडात्मक कारवाई करा, असे सक्त निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहेत. तसेच ज्या घराच्या बेसमेंट मध्ये पाणी साचत आहे आणि त्याच्यातून डासोत्पत्ती होत आहे अश्या बेसमेंटच्या मालकांवर सुध्दा कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
            शहरात डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापौरांनी डेंग्यू संदर्भात मनपाद्वारे राबविण्यात येणा-या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक बोलाविली. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, उपायुक्त राजेश भगत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, मलेरिया- फायलेरिया अधिकारी दीपाली नासरे, सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, प्रकाश वराडे, हरीश राउत, अशोक पाटील, विजय हुमने, घनश्याम पंधरे, सहायक आयुक्त किरण बगडे, साधना पाटील, सुषमा मांडगे यांच्यासह सर्व झोन अधिकारी व मलेरिया, फायलेरिया निरीक्षक उपस्थित होते.