info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  20 Oct 2021

कळमना भागात मेट्रोचा उड्डाण पूल कोसळला


- पुलाच्या कामात  भ्रष्टाचाराचा आरोप
 - ईदच्या सुट्टीमुळे मोठी प्राणहानी टळली

नागपूर,दि.19-  कळमना -पारडीला जोडणारा मेट्रो रेल्वेचा पुल रात्री अचानक कोसळला. सुट्टीचा दिवस असल्याने अनर्थ टळला. या अपघाताने दहशत माजली. 

या घटनेने नागपूरकर पुला खालून जाण्यास घाबरत आहेत. या बांधकामाचे भूमिपूजव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये केले होते. 450 कोटीच्या यापुलाचे काम 2016 मध्ये पुर्ण करावयाचे होते. ते 2021 ला पुर्ण झाले. त्याचे लोकार्पण जानेवारी- 2022 ला होणार होते. त्यापुर्वीच ते कोसळले. बांधकाम निकृष्ठ झाल्याने ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. रात्री ९ वाजून ३८ मिनिटांला या उड्डाण पुलाचा चक्क ३० मीटरचा अख्खा स्लॉट खाली कोसळला. धाडकन आवाज आल्याने लोक घराबाहेर पडले. घटनास्थळी  एकच गर्दी उसळली.

२०१४ साली  नरेंद्र मोदी  पंतप्रधान पदी आसनस्थ झाले.  तेव्हा गडकरी नागपूरचे खासदार म्हणून निवडून आले. ते केंद्रिय मंत्री झाले. त्यांनी  त्याच वर्षी जून २०१४ मध्ये नागपूरात १० हजार कोटींची ‘मेट्रो’आणली तर कळमन्याचा ४५० कोटींच्या पूलाचेही उदघाटन पंतप्रधान यांच्या हस्ते आभासी माध्यमातून करवून घेतले.

या पुलाच्या बांधकामाची जवाबदारी  राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे  होती.या विभागाने या पुलाच्या बांधकामाची जवाबदारी मुंबईतील   ‘जेडीसीएल तसेच एमएसएएल’या कंपन्यांकडे सोपवल. या दोन्ही कंपन्या भाजपच्या एका माजी खासदाराच्या आहेत. पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे.  पिल्लर्सवर भेंगा पडल्याची तक्रार विरोधकांनी अनेक वेळा राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे करुन देखील त्या तक्रारींकडे दूर्लक्ष करण्यात आले. आठवड्याभरा पुर्वीच अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली होती. लिखित स्वरुपात वर्क ऑर्डर देतानाच कामाची गुणवत्ता आणि वेळेची मर्यादा नमूद आहे. त्या अटी व शर्थीच्या अधीन राहूनच कंत्राटदारांना कामे दिली जातात.नियम व कायदे हे नागरिकांच्या जीवितासाठी असतात.त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडला.