आता एकाचवेळी सहा विद्यापीठांची पदवी घेता येणार
आता एकाचवेळी सहा विद्यापीठांची पदवी घेता येणार- चंद्रकांत पाटील
- नवे शैक्षणिक धोरण
- पदवीनंतर पीएचडीचीही मुभा
नागपूर, दि.21-हिवाळी अधिवेशनाचे आज तिसरे दिवस. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती दिली. देशात स्वायत्त महाविद्यालये आणि स्वायत्त विद्यापीठ तयार व्हावेत, हा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरला होता. यापूर्वी एकावेळी एकाच विद्यापीठाची पदवी आपण घेऊ शकत होतो. आता एकाच वेळी सहा विद्यापीठांची पदवी आपण घेऊ शकतो, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, महाराष्ट्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हळूहळू स्वायत्त महाविद्यालय आणि स्वायत्त विद्यापीठ तयार व्हावीत. ज्यामुळे अभ्यासक्रमातील म्हणजे एकच अभ्यासक्रम वर्षांनुवर्षे शिकवले जातात. हा जो भाग आहे त्यामध्ये प्रयोगांना परवानगी देण्यात आली. ज्यामध्ये आता १२ वी नंतर तीन वर्षाची डिग्री आता चार वर्षांची करण्यात आली. ज्यामध्ये मल्टी एंन्ट्री आणि मल्टी एक्सिट ठेवली आहे. यामध्ये दोन वर्ष तुम्ही अभ्यासक्रम थांबवून काही वर्षांच्या गॅप नंतर पुन्हा अभ्यासक्रम जॉईन करू शकता. दोन वर्षांमध्ये तुम्ही जो कोर्स पूर्ण केला त्याचे क्रेडिट तुमच्या डिजिटल लॉकरमध्ये जमा होतात. आता जगातल्या सगळ्या विद्यापीठांचा एमओयू पूर्ण होत आला. ज्याच्या आधारावर आपल्या देशात दोन वर्ष पूर्ण केलेले क्रेडिट घेऊन परदेशातल्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ शकता. तुम्ही तिथे पुढचं शिक्षण घेऊ शकता, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
एका वेळेला आपण एकाच विद्यापीठाची पदवी घेऊ शकत होतो, आता एका वेळेला तुम्ही सहा सहा विद्यापीठांच्या पदव्या घेऊ शकता. आता ग्रॅज्युएशन नंतर पण पीएचडी करू शकता अशी शिक्षणामध्ये एका अर्थाने सुकरता आणण्याचा जो प्रयत्न सुरु आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवजवळ १४० कॉलेजेसना स्वायत्त महाविद्यालय म्हणून आपण परवानगी दिली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.