info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  09 Jul 2023

अर्जुनी/मोरगाव पोलिस ठाणे देशात चमकले


 - राज्यात सर्वोत्कृष्ट पांच ठाण्यात निवड

*नागपूर, दि.9-  गोंदिया जिल्ह्यातील पोलिस ठाणें अर्जुनी/मोरगाव राज्यात सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे- 2021 घोषित  करण्यात आले.
 सन 2016 मध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या देशव्यापी परिषदेत पोलिस ठाण्यात निकोप स्पर्धा वाढावी. कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, दोषसिध्दी यामध्ये सुधारणा व्हावी .यासाठी देशपातळीवर 10 सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची  निवड करण्याबाबत निर्णय  घेण्यात आला. त्यानुसार सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून करण्यात येते.
 सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्र पोलीस दलातील  5 ठाण्यांची निवड करण्यात आली. ही ठाणी आता देशपातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांच्या  स्पर्धेत भाग घेतील.  या निवडीत राज्यातील पोलीस ठाण्यांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, गुणवत्ता वाढविणे , दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे,  गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हयाचा तपास, आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संबंधित पोलीस अधिकारी / अंमलदार यांना प्रोत्साहित करणे, इत्यादी हेतू साध्य करण्यासाठी सन 2020 या वर्षापासून राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट 5 पोलीस ठाण्यांची निवड करुन सदर पोलीस ठाण्यांना सन्मानचिन्ह व रोख बक्षिस प्रदान करण्यात येत आहेत.
       
          त्याच धर्तीवर सन- 2021 या वर्षातील कार्यमुल्यांकनाच्या बाबतीत राज्य पातळीवर *सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे स्पर्धेकरीता निश्चित करून दिलेले गुणांकन, निकष व नियमावली  लक्षात जिल्हास्तर, विभागीयस्तर पेलिस आयुक्त्तस्तर अशा स्पर्धेनंतर 
 राज्यस्तरिय स्पर्धा  झाली. यात
महाराष्ट्रातील 5 पोलिस स्टेशनची निवड करण्यात आली . त्यात 
1) शिवाजीनगर पोलीस ठाणे (कोल्हापूर)
2) देगलुर पोलीस ठाणे (नांदेड)
3) वाळुंज पोलीस ठाणे (छत्रपती संभाजी नगर शहर), 4) अर्जुनी मोर पोलीस ठाणे (गोंदिया) , 5) राबोडी पोलीस ठाणे (ठाणे शहर) या 5 पोलीस ठाण्यांना सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून निवड करण्यात आली.
अशाप्रकारे गोंदिया जिल्हयातील *पोलीस ठाणे अर्जुनी मोरगाव ठाण्याने  गोंदिया जिल्हा पोलिस दलाचा संपूर्ण देशात व राज्यात नावलौकिक वाढविला आहे.