info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  16 Apr 2023

बुध्दगयेत जागा शोधा -देवेंद्र फडणवीस

*बुध्दगयेत जागा शोधा, जागतिक दर्जाचे पर्यटक विश्रामगृह बनवू- देवेंद्र फडणवीस*

नागपूर, दि.15- बुध्दगयेत जागा शोधा. तिथे  जागतिक दर्जाचे बौध्द पर्यंटक विश्रामगृह उभारू . जिथे बौध्द पर्यटकांची निवास व बौध्द साहित्य अध्ययनाची सोय होईल. त्याचा खर्च राज्य सरकार करील असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

उत्तर नागपुरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्हेंशन सेंटरचे 14 एप्रिल-2023 रोजी लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमापुर्वी माजी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपसात चर्चा झाली. तेव्हा बडोले यांनी बुध्दगयेतील पर्यंटक विश्राम गृह उभारणीच्या मागणीकडे लक्ष वेधले.
  फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने जागा  शोधा . निधी राज्य सरकार देईल. ते भवन जागतिक दर्जाचे होईल असे बनवू असेही ते म्हणाले.

बिहार राज्यातील फाल्गून नदीच्या काठावर बुध्दगया आहे. येथील बोधीवृक्षाखाली गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झाले. ते बोधि वृक्ष आजही कायम आहे. त्यामुळे हे स्थळ जगभरातील बौध्द पवित्र  मानतात. जगभरातील बौध्दबांधव येथे येत असतात. त्यात महाराष्ट्रातून जाणाऱ्या पर्यंटकांची संख्या सर्वाधिक असते. त्यांची  सोय होईल.
 उत्तर नागपुरातील  डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय  कन्व्हेंशन सेंटर एक बौद्धिक संपदा ठरणार आहे.  या सेंटरचा  लोकार्पण  सोहळा पार पडला. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी  यांनी  या सेंटरच्या उभारणीसाठी तत्कालिन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी 80 कोटी रुपये दिले. वारंवार बैठका घेतल्या. त्यामुळे हे सेंटर आंतरराष्ट्रीय दर्जाचे  बनले. मी मुख्यमंत्री असताना माझ्याकडे एक बैठक झाली. त्यात येणाऱ्या सर्व अडचणी दूर केल्या.  पाया उत्कृष्ट झाल्याने हे केंद्र आकर्षक व उपयोगी बनले.