info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  24 Aug 2024

आंतरराष्ट्रीय बौध्द धम्न परिषद आज सडक/अर्जुनीत होणार


- बौध्द विहारांना बुध्द मूर्तींचे वाटप

नागपूर ,दि.24-

बुध्दीस्ट सोसायटी  ऑफ इंडिया,राजकुमार बडोले फाऊंडेशन त्रिरत्न भूमी सोसायटी आणि गगन मलिक फाऊंडेशनचा संयुक्त विद्यमाने 25 ऑगस्ट रोजी  सडक/अर्जुनीत आंतरराष्ट्रीय बौध्द धम्म परिषद आयोजित आहे. गोंदिया जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी धम्म परिषद आहे.

माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने होणारी ही धम्म परिषद आहे. या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी थॉयलँडच्या वाट थोथोंग मठाचे भंन्ते फाखरू शिलाखुंसमोथन राहतील. तर उदघाटक अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे माजी सचिव डॉ.संदेश वाघ, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव अनिल हिरेखन करतील. प्रमुख पाहुणे चित्रपट अभिनेता गगन मलिक, डॉ.नटकीट सी. मंगल,चंद्रबोधी पाटील,विरेंद्र अंजनकर, भंते फ्रमहा सिरिचय यनावत्थोना,भंते प्रशिलरत्न गौत्तम,भंते संघधातू, भंते धम्मज्योती राहतील.