info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  18 Nov 2024

*शेतकऱ्यांना ऊर्जादाता, इंधन दाता करणार- नितीन गडकरी* - राजकुम

*शेतकऱ्यांना ऊर्जादाता, इंधन दाता करणार- नितीन गडकरी*
- राजकुमार बडोले यांच्या प्रचारार्थ विराट सभा

सडक अर्जूनी, दि.18- दुध क्रांती, मत्स क्रांती व पीक क्रांतीच्या माध्यमातून अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना उर्जादाता, इंधनदाता आणि सीएनजीदाता करून या भागात सुख ,समृध्दी आणू अशी घोषणा देशाचे केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी  यांनी केले.

गडकरी महायुतीचे संयुक्त उमेदवार राजकुमार बडोले यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित विराट सभेत बोलत होते . मंचावर प्रफुल्ल पटेल, नरोत्तम मिश्रा, सुनील मेंढे, रचना गहाणे, शेषराव गिऱ्हेपुंजे ,भाजप, राकॉ, शिवसेनेचे जिल्हास्तरीय पदाधिकरी हजर होते. ते म्हणाले आज माझा  पश्चिम महाराष्ट्राचा दौरा होता. तो रद्द करून सरळ मुंबईवरून    सरळ अर्जुनीच्या सभेसाठी आलो. कारण मी आणि देवेंद्र  फडणवीस दोघांनी त्यांना घड्याळ चिन्हावर लढण्यास सांगितले. कारण चांगली माणसे निवडून आली पाहिजे. त्यासाठी ही उमेदवारी देण्यात आली. त्या बडोले यांना विक्रमी मताने निवडून आणा आणि विरोधी उमेदवाराची जमानत जप्त करा. या भागाचा विकास राजकुमार बडोले यांच्या माध्यमातून  मी आणि प्रफुल्ल पटेल  करणार आहोत. चविष्ट खावयाचे असेल तर चांगल्या हॉटेलमध्ये जाता. चांगल्या उपचार हवा. तर चांगल्या डॉक्टरकडे जाता. तसेच जात,धर्म, पंथाचा विचार न करता सर्वांच्या विकासासाठी झटणारा चांगला, उच्च विद्याविभूसित ,इंजिनिअर उमेदवार राजकुमार बडोले आहे. त्यांना विजयी करा असे उपस्थितांना आवाहन केले.

गडकरी पुढे म्हणाले, बडोले यांच्या प्रयत्नामुळे लंडनमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर राहात असलेले घर महाराष्ट्र सरकारने विकत घेतले. ते स्मृर्ती भवन केले. मुंबईची इंदू मीलची जागा मिळवून तिथे डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक मंजूर करवून घेतले. अनेक रस्ते व योजना मंजूर करून घेतल्या. या भागात 70 टक्के जंगल आणि 80 टक्के खनिज आहेत. त्या माध्यमातून या भागाचा कायापालट करण्यात येईल.

*सुपर स्पेशालिटी व्हेटरनरी हॉस्पीटलची घोषणा*
 दुबई, सिंगापूरात झिंग्यास चांगला  सात ,आठ हजार  रूपये भाव आहे. 25 ते 50 लिटर दुध देणाऱ्या संकरित गाई पैदास करू. त्यासाठी या मतदार संघात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उघडण्यात येईल. दुध व मत्स्स जोड धंदे देऊ.  महिला बचत गटांना ड्रोन देऊ. त्याद्वारे औषधी व खत फवारणी करून एकरी उत्पादन पाचपटीने वाढवू. 

नागपूर- रायपूर, कोहमारा -बालाघाट मार्ग चारपदरी करण्यासह सरळ हे मार्ग विशाखापट्टमला जोडू. ज्यामुळे या भागातील खनिज व अन्य उत्पादनांची सरळ निर्यात करण्यात येईल. तांदूळ, मक्का, कणिसांपासून इथेनॉलचे उत्पादन करू. इंथेनॉलवर चालणारे ट्रॅक्कटर व अन्य वाहने त्यावर चालतील. त्यातून शेतकरी उत्पादीत माल निर्यात होईल.शेतकऱ्याला जादा भाव मिळेल. गाव रस्ते विकासाचा कार्यक्रम आहे. स्मार्ट गावांची निर्मितीवर सुध्दा भर आहे.  विकासाच्या अनेक योजनांचा उहापोह करीत कॉंग्रेसच्या चुकीच्या धोरणांचाही समाचार घेतला.

*धापेवाडा टप्पा-3- पटेल*

खा. प्रफुल्ल पटेल यांनी धापेवाडा सिंचन प्रकल्प टप्पा-3 चा उल्लेख करीत महायुतीचे सरकार या प्रकल्पाचे पाणी उमरझरी सिंचन प्रकल्प व नवेगाव बांधात सोडून शेतकऱ्यांना जादा ओलिताच्या सोयी देणार. झाशीनगर उपसा सिंचन आदी राजकुमार बडोले सारख्या अनुभवी  इंजिनिअरकडून पूर्ण करू माझी आणि गडकरी या दोघांच्या साथीने या भागाचा विकास करतील अशी ग्वाही त्यांनी दिली.

*सर्वाच्या विकासाची हमी-बडोले*
महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले म्हणाले, मी जात,पात,धर्म,पंथ आणि पक्ष असा कधीच भेद केला नाही. भविष्यातही करणार नाही. त्यामुळे सर्वच पक्षाचे लोक माझ्या प्रचारात राबत आहेत. आणखी दोन दिवस असेच परिश्रम चालू द्या असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले. सभेला उसळेल्या गर्दीचा उल्लेख करीत गडकरी यांनी साधा विजय नाही. तर विक्रमी मतांनी बडोले यांना विजयी करा असे आवाहन केले. त्यांला टाळ्याच्या गजरात गर्दीने प्रतिसाद दिला. एवढ्या गर्दीची या मतदार संघातील पहिली सभा होय. तिने संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले. जाहीर प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता.