राजकुमार बडोले यांच्याकडून सुजाता सैनिक यांचे स्वागत
मुंबई, दि.15-महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली त्याबद्दल माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी श्रीमती सुजाता सौनिक यांचे अभिनंदन केले.
तसेच त्यांना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विवीध प्रश्नांबाबत निवेदन दिले.
१).न्या विभागाच्या अधिनस्त राज्य अनु.जाती जमाती आयोगाला अध्यक्ष नाही व 5000 पेक्षा जास्त प्रकरणे सुनावणी साठी प्रलंबित आहेत.
२)अनु जाति जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार राज्य संनियंत्रण समितीची बैठक दरवर्षी सहा महीन्यात एकदा होने अनिवार्य आहे.ती बैठक पाच वर्षांत झाली नाही.ती त्वरित घेण्यात यावी.
३)अनु जाति जमाती करीता परदेशी शिष्यवृत्ती योजनेत यावर्षी जाचक अटी लागलेल्या आहेत.त्या त्वरीत रद्द करण्यात येवुन परदेशी शिक्षणाचा मार्ग सुलभ करणे.
४) डॉ बाबासाहेब आंबेडकर समता प्रतीष्ठाण लाभ निधी वितरीत करुन त्यांचें कार्यालय उपविधी नुसार कार्यान्वित करावे.
५)Stand up योजना,Mudra योजना,Venture capital,मार्जीन मनी या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे.
६) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर अशासकीय समीती स्थापन करणे.
वरील बाबत मा.मुख्य सचिवांनी त्वरीत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावे यासाठी निवेदन दिले.