info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  07 Jul 2024

मो/ अर्जुनीत महायूतीचे राजकुमार बडोले हेच उमेदवार


जिल्हा प्रतिनिधी
गोंदिया, दि.6 जुलै- विधान सभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. त्यामुळे मोरगावी/अर्जूनी विधानसभा मतदार संघात कोण लढणार. यावर वेगवेगळे अंदाज बांधले जात होते.भाजपच्या दोन्ही सर्वेमध्ये राजकुमार बडोले आघाडीवर राहिले. या कारणाने भाजप हायकंमाडने माजी मंत्री राजकुमार बडोले यांना कामास लागा असा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी वाररूम उघडून जनसंपर्क सुरू केला. ते 2019 च्या निवडणुकीत अवघ्या चारशे मतांनी पराभूत झाले होते. यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबाबत सहानुभूती आहे. उलट राकॉचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांच्याबाबत लोकांमध्ये रोष आहे. "  मेरी सुनो " या स्वभावाने लोक दुखावल्याचे समोर आले.तसेच आमदार जनसंपर्कात पिछाडीवर आहेत. त्याची प्रचिती लोकसभा निवडणूक प्रचारातही आली. तेव्हापासून  ही जागा भाजपनेच लढावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.
 मागच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. त्याचा लाभ मनोहर चंद्रिकापूरे यांना मिळाला. आता राष्ट्रवादीत दोन गट पडले. प्रमुख गट शरद पवार यांचा आहे. हे लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले. अजित पवार गट अतिशय कमजोर झाला. याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या फुटीला प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल दोषी आहेत. हा रोष  लोकसभेत दिसला. हा रोष भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला. ही बाब रणजित पाटील समितीच्या आढाव्यात समोर आली. त्यामुळे ही जागा अजित पवार गटाला अजिबात सोडू नये  असे भाजप कार्यकर्त्यांना वाटते. यावेळी कॉंग्रेस व राकॉ(अजित)वेगवेगळे लढणार आहेत. कॉग्रेस वजा केल्यावर रॉष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा जनाधार अत्यल्प उरते. ही बाब भाजप पक्ष श्रेष्ठीच्या लक्षात आली. परिणामी विद्यमान आमदाराला उमेदवारी देण्यास विरोध आहे.
साकोलीत नाना पटोले लढणार आहेत. जिल्ह्यातील लोक त्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून बघतात. ते चांगल्या आघाडीने हमखास विजय होतील. भंडारा शिंदे गटाला जाणार. तिरोडा राकॉच लढवेल. पटेल एकनिष्ट म्हणून आ. कारमोरे ओळखले जातात. गोंदिया अपक्ष आ.विनोद अग्रवाल की गोपाल अग्रवाल असा तिढा कायम आहे. कॉंग्रेस या मतदार संघात ओबीसी उमेदवार उतरविणार हे निश्चित आहे. या मतदार संघात तगडा उमेदवार देण्याची कॉंगेसची रणनिती ठरली आहे. या मतदार संघासाठी अजित पवार गट सुध्दा आग्रही आहे. एक अग्रवाल लढविण्यात येणार अशी चर्चा आहे. हा मतदार संघ प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी प्रतिष्ठेचा आहे.मात्र या मतदार संघाने सातत्याने पटेल यांच्या विरोधात कौल दिला आहे. आमगाव मतदार संघाचा उमेदवार ठरला आहे.
बडोले हे पराभवानंतर सुध्दा सातत्याने मतदार संघात सक्रीय आहेत. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव आहे. याशिवाय सर्वच पक्षात त्यांचे हितचिंतक ही त्यांची जमेची बाजूआहे. 2019 च्या निवडणुकीत कॉंग्रेस व राकॉ दोन्ही पक्ष एकत्र लढले. हा मतदार संघ कॉंग्रेसचा आहे. कॉग्रेस वगळून राकॉं नगण्य आहे. याशिवाय चंद्रिकापूरे यांना पक्षातच जबरदस्त विरोध आहे. पटेस-जैन विरोधात अनेकदा  चुकीची विधाने केली. ती विधाने  हिंतचिंतक विसरले नाहीत.  त्यामुळे या मतदार संघात भाजप  जोखीम घेण्यास तयार नाही.