info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  02 Jul 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस      राजभवनात घेतली शपथ

मुंबई ,दि.30- शिवसेना बंडखोर  एकनाथ शिंदे यांनी आज राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.  उध्दव ठाकरे यांच्यावर आरोप करीत आमदारांचा एक गट शिवसेनेतून वेगळा झाला. या गटाने भाजपला पाठिंबा दिला. बंडखोर आमदार सूरत, गोवाहाटी, गोवा असा प्रवास करते झाले. दरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी बहुमत सिध्द करण्याचा आदेश दिला. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.