हिंसक वाघाला जेरबंद करा-सुधीर मुनगंटीवार
-राजकुमार बडोले यांचे पालकमंत्र्यांना साकडे
- रस्त्यात भरला जनता दरबार
*मोरगाव/अर्जुनी, दि.24*- या भागातील लोकांचे जिवास धोकादायक ठरलेल्या हिंसक वाघास जेरबंद करा, असा आदेश राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी वन अधिकाऱ्यांना दिले.
माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी ना. मुनगंटीवार यांना मोरगाव/अर्जुनीत थांबविले. तिथेच उभा जनता दरबार लागला. या दरबारात लोकांनी आपल्या व्यथा मांडल्या. वाघांने एका महिलेला मारले.अनेकांच्या जनावरांची शिकार केली.वाघ गावात येत आहे. त्यामुळे शेतात जाणे.घरा बाहेर पडणे धोकादायक झाले. मुलांना शाळेत पाठविणे सुध्दा धोकादायक झाले .अनेकांचा कामधंदा बुडाला. त्या हिंसक वाघाचा बंदोबस्त करा, नुकसान भरपाई द्या ,अशी मागणी बडोले यांनी केली. लोकांनी सुध्दा आपबिती सांगितली. त्यामुळे वनमंत्री द्रविले. त्यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना मोबाईल लावला. त्या हिंसक वाघाला जेरबंद करा. लोकांना निर्भयपणे जगू द्या. कारवाईच्या संदर्भात कळवा असे आदेश दिले. त्या आदेशाचे लोकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. हसऱ्या चेहऱ्याने गावकरी परतले.
यानंतर विविध गावच्या गावकऱ्यांनी आपआपल्या गावातील तक्रारींचे निवेदन देणे सुरू केले. कोणी रस्ता मागितला. कोणी रखडलेल्या पुलाची व्यथा मांडली. काहींनी पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी जलपुरवठ्याची मागणी केली. कोणी बायपास मार्ग मागितला असे अनेक निवेदने दिली. मंत्री महोदयांनी लोकांची निवेदने घेतली. चर्चा केली. तेव्हाच सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर समाधानी चेहऱ्याने बाहेर पडले.
*सकाळची न्याहरी सायंकाळी*
लोकांच्या गराड्यातून बाहेर पडताच एका सहकाऱ्याने सुधीरभाऊंना जेवनाची आठवण करून दिली. तेव्हा सायंकाळचे चार वाजले होते. गाडीत बसले. थोडे पुढे गेले. गाडी थांबविली. वाटेतच न्याहरी उरकली. त्यानंतर ताफा गोंदियाच्या दिशेने रवाना झाला. सकाळचा डब्बा चार वाजता घेतला. सायंकाळी पाच वाजता गोंदियात पोहचले. तेथून सरळ जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. तिथे डिपीडिसी बैठक सुरू झाली.