info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  02 Jul 2024

लोकमत समुहाच्यावतीने झाडीपट्टीतील मान्यवरांचा सत्कार* नागपूर दि.30 -गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्हा भूषण पुरस्कार वितरण सोहळा हॉटेल तुली इंम्पोरियममध्ये नुकताच पार पडला.या कार्यक्रमात गोंदिया, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना स्मृतिचिन्ह  व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री राजकुमार बडोले, खासदार नामदेव किरसान व मराठी अभिनेत्री अम्रुता खानविलकर ह्या  उपस्थीत होत्या.
या कार्यक्रमाला संबोधित करताना माजी मंत्री राजकुमार बडोले म्हणाले, लोकमत व्रुतपत्र समुहाने मागील चाळीस वर्षांत जनसामान्य माणसांच्या घरात स्वतःचे स्थान निर्माण केले. त्याबद्दल लोकमत समुहाचे व लोकमत समुहाचे संस्थापक दिवंगत बाबुजी जवाहरलाल  दर्डा यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली.
गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातील वनसंपदेने नटलेल्या व नवेगाव, नागझिरा अभयारण्यात वसलेल्या मुळ रहिवासी लोकांची निरागसता व  वैनगंगा, बाघ, गाढवी, प्राणहिता या नद्यांनी दिलेले सुपिकतेचे वरदान घेऊन व माजी मालगुजारी तलावांच्या आश्रयांने जगणाऱ्या झाडीपट्टीतील सम्रुद्धतेची आठवण त्यांनी या प्रसंगी करुन दिली.नाटक,दंडार व तमाशा या पारंपारिक कलांची जोपासना करणार्या पुर्व विदर्भातील या जिल्ह्यातील कर्मयोगी लोकांचा लोकमत समुहाचे माध्यमातून सत्कार होतांना मला खुप आनंद होत आहे .
या प्रसंगी माजी आमदार संजय पुराम, ज्येष्ठ नेते जीवन लंजे, युवा मोर्चा भाजपचे जिल्हा अध्यक्ष ओम कटरे, गोरेगावचे माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार,डव्वा येथील सामाजिक कार्यकर्ते लिलेश्वर रहांगडाले, जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम,मोहाडी येथील सरपंच नरेंद्र चौरागडे, भाजप चे जेष्ठ नेते डॉ.गजानन डोंगरावर,जि.प.सभापती सोनु कुथे,वनानी फाउंडेशन चे संचालक गौतम साखरे व अनेक मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन या प्रसंगी सत्कार करण्यात आला.