info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  15 Oct 2023

महाड चवदार चळ्याचे पाणी स्वच्छ करा-राजकुमार बडोले

महाड चवदार तळ्याचे पाणी शेवाळीने दुषित

महाड, दि.15 -  महाड चवदार तळ्याच्या पाण्याचे महत्व वेगळे आहे. ते मानवी अस्मिता, विषमता मुक्ती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या क्रांती लढ्याशी संबंधित आहे. त्या चवदार तळ्याचे पाणी विषारी शेवाळमय झाले. ते पाणी महाड नगर परिषदेने तातडीने स्वच्छ करावे अशी मागणी माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. 

 ते म्हणाले , पाण्याचे साधे शुद्धीकरण महाड नगरपरिषदेने करु नये,हे  अत्यन्त क्लेषदायक आहे. मी सामाजिक न्याय मंत्री असताना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त या चवदार तळ्याच्या पाण्याचे शुद्धीकरणासाठी २ कोटी रुपये दिले होते. पण राजकीय स्वार्थ साधण्याचा हेतुने आणि श्रेयाच्या राजकारणात ते काम रखडले. आमची स्फुर्तीस्थाने, अशा पद्धतीने कुठेतरी आपसी भांडणात, किंवा राजकीय हेतुच्या चक्रात अडकली जावु नयेत अशी अपेक्षा आहे.आज महाराष्ट्रातील असंख्य बौद्ध शिलालेख आणि शिल्पे अशीच उपेक्षीत पाहुन मनाला खुप वेदना होतात. आंबेडकरी विचार क्रांतीच्या या वास्तुंचे आणि स्मारकांचे योग्य जतन करण्यासाठी राज्य सरकारने दुर्लक्ष न करता योग्य उपाय योजना करावी ही विनंती आहे. आज येवले, महाड,औरंगाबाद, नागपूर आणि महाराष्ट्रातील असंख्य स्मारकांची देखभाल करण्यासाठी योग्य यंत्रणा सरकारजवळ नाही. तरी मुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे लक्ष द्यावे. असेही आवाहन केले.